नवी दिल्ली : सेवानिवृत्तीच्या दिवशीच संबंधित कर्मचाऱ्याची पेन्शन आॅर्डर काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे सेवानिवृत्तीनंतर कार्यालयाचे खेटे मारण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे.
कार्मिक, लोक तक्रार आणि पेन्शन राज्यमंत्री जितेद्र सिंह यांनी सांगितले की, पेन्शन आणि पेन्शनभोक्ता कल्याण विभाग पेन्शनधारकांना सन्मानाने जीवन जगता यावे या विचारातून या सर्व बाबींवर विचार करीत आहे. राज्यांच्या पेन्शनशी संबंधित सचिवांच्या पहिल्या परिषदेत ते बोलत होते. लवकरच यासंबंधीच्या निर्णयावर केंद्र सरकार शिक्कामोर्तब करणार आहे.
जितेंद्र सिंह पुढे म्हणाले की, ‘कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्व प्रकारचे पेन्शन भत्ते शंभर टक्के देण्याचे आमचे लक्ष्य आहे. यासंदर्भात लवकरच आदेश जारी केला जाईल.’ पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने यासंबंधीच्या अर्जाचा आढावा तथा सर्व प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शन आॅर्डर
सेवानिवृत्तीच्या दिवशीच संबंधित कर्मचाऱ्याची पेन्शन आॅर्डर काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे सेवानिवृत्तीनंतर कार्यालयाचे खेटे मारण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे.
By admin | Updated: June 13, 2014 04:17 IST2014-06-13T04:17:04+5:302014-06-13T04:17:04+5:30
सेवानिवृत्तीच्या दिवशीच संबंधित कर्मचाऱ्याची पेन्शन आॅर्डर काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे सेवानिवृत्तीनंतर कार्यालयाचे खेटे मारण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे.
