भंडारा : घरबांधणीसाठी घेतलेल्या कर्जापेक्षा अधिक कर्ज वसूल करणाऱ्या गृह फायनान्स कंपनी शाखा नागपूर व भंडारा येथील व्यवस्थापकांनी ६९ हजार १४९ रुपये व्याजासह परत करावेत, असा निर्णय ग्राहक मंचने दिला.
सिंधूताई कोडापे व परसराम कोडापे, रा. शिवनगरी, खात रोड, भंडारा यांनी गृह फायनान्स कंपनी शाखा नागपूर व भंडारा यांच्याकडून घरबांधणीसाठी कर्ज घेतले होते. त्यावेळी व्याजाचा दर ठरविण्यात आला होता. ठरावाप्रमाणे व्याजासह कर्जाचा भरणा करण्यात आला. मात्र कंपनीने अधिक व्याजदर आकारून ४९,१४९ रुपये अधिकचे कर्ज वसूल केले. कोडापे यांनी कंपनीकडे अधिकच्या वसूल केलेल्या रकमेची मागणी केली; परंतु कंपनीने कोडापे यांना १४ हजार ३३७ रुपयांच्या वसुलीचे पत्र पाठविले. कंपनी रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसताच कोडापे दाम्पत्याने ग्राहक मंचकडे धाव घेतली. मंचने गृह फायनान्स कंपनी शाखा नागपूर व भंडारा येथील व्यवस्थापकांना नोटीस पाठविली. दोन्ही पक्षाचे दस्तावेज व वकिलांच्या युक्तिवादानंतर मंचने गृह फायनान्स कंपनी शाखा नागपूर व भंडारा येथील व्यवस्थापकांनी कोडापे दाम्पत्याला ४९ हजार १४९ रुपये व्याजासह परत करावेत, त्रासापोटी १५ हजार रुपये तर तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये अदा करावेत, असा आदेश पारित केला. (प्रतिनिधी)
गृह फायनान्स कंपनीला ६९ हजार रुपयांचा दंड
घरबांधणीसाठी घेतलेल्या कर्जापेक्षा अधिक कर्ज वसूल करणाऱ्या गृह फायनान्स कंपनी शाखा नागपूर व भंडारा येथील व्यवस्थापकांनी ६९ हजार
By admin | Updated: June 24, 2015 00:24 IST2015-06-24T00:24:49+5:302015-06-24T00:24:49+5:30
घरबांधणीसाठी घेतलेल्या कर्जापेक्षा अधिक कर्ज वसूल करणाऱ्या गृह फायनान्स कंपनी शाखा नागपूर व भंडारा येथील व्यवस्थापकांनी ६९ हजार
