नवी दिल्ली : आयकराच्या रिफंडची वाट बघत असलेल्या लक्षावधी करदात्यांसाठी चांगली बातमी आहे. ५० हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या दाव्यांना लवकर निकाली काढण्याचे आदेश सरकारने अधिकाऱ्यांना दिले.
सरकारी आकडेवारीनुसार ५,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत करायची आहे. या आठवड्यात महसूल सचिव हसमुख अधिया यांनी प्रत्यक्ष कर मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वरील आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करदात्यांचे प्रश्न आणि त्यांना वाटणारी काळजी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अर्थ मंत्रालय करदात्यांना अनुकूल पद्धत तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. २०१३-२०१४ या आर्थिक वर्षातील २.०७ लाख आयटी रिटर्नसाठी ६५९ कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.
‘५० हजारांआतील आयकर रिफंड त्वरित अदा करा’
आयकराच्या रिफंडची वाट बघत असलेल्या लक्षावधी करदात्यांसाठी चांगली बातमी आहे. ५० हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या दाव्यांना लवकर निकाली काढण्याचे आदेश सरकारने अधिकाऱ्यांना दिले.
By admin | Updated: December 6, 2015 22:41 IST2015-12-06T22:41:17+5:302015-12-06T22:41:17+5:30
आयकराच्या रिफंडची वाट बघत असलेल्या लक्षावधी करदात्यांसाठी चांगली बातमी आहे. ५० हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या दाव्यांना लवकर निकाली काढण्याचे आदेश सरकारने अधिकाऱ्यांना दिले.