नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ करण्याची शिफारस केल्याने खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमधील कर्मचारीही याचप्रमाणे वेतनवाढीची अपेक्षा करीत आहेत.
सातव्या वेतन आयोगाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना २३.५५ टक्के वेतनवाढ करण्याची शिफारस केली आहे, तर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मात्र निराशेचे वातावरण आहे.
टाइम्सजॉब डॉट कॉमच्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी खाजगी क्षेत्रातील ६८ टक्के कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची प्रस्तावित वेतनवाढ अनुचित आहे. ४७ टक्के कर्मचारी म्हणतात की, वेतनवाढीचा कामकाजाशी काहीही ताळमेळ
नाही.
वेतनवाढीमुळे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नातील विषमता आणखी वाढेल, असे मत ३० टक्के कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
वेतन आयोगाने खाजगी क्षेत्रातही अपेक्षा वाढल्या
सातव्या वेतन आयोगाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ करण्याची शिफारस केल्याने खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमधील कर्मचारीही याचप्रमाणे वेतनवाढीची अपेक्षा करीत आहेत.
By admin | Updated: December 12, 2015 00:01 IST2015-12-12T00:01:53+5:302015-12-12T00:01:53+5:30
सातव्या वेतन आयोगाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ करण्याची शिफारस केल्याने खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमधील कर्मचारीही याचप्रमाणे वेतनवाढीची अपेक्षा करीत आहेत.
