नवी दिल्ली : जुलै अखेरपर्यंत प्राप्तिकराचे विवरण भरण्यासाठी करदात्यांची धावपळ सुरू असताना प्राप्तिकर विभागाच्या नावे येणाऱ्या बनावट ई- मेलपासून सावधान राहण्याचा इशारा विभागाने दिला आहे. बनावट ई-मेल आल्यानंतर त्याची माहिती द्यावी, अशी सूचनाही प्राप्तीकर विभागाने केली आहे.
प्राप्तिकर विभागाच्या नावाने काही करदात्यांना बनावट ई-मेल आल्याचे अर्थ मंत्रालयाने प्राप्तिकर विभागाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यानंतर त्याची गंभीर दखल घेत प्राप्तिकर विभागाने सर्व करदात्यांना त्याबाबत सूचित केले आहे. प्राप्तिकराची रक्कम जाणून घेण्यासाठी काही फाईल्स डाऊनलोड करण्याची सूचना संबंधित बनावट ई-मेलमध्ये केलेली असते.
या ई-मेलमध्ये व्हायरस असू शकतो. त्याद्वारे सॉफ्टवेअरचे नुकसान होऊ शकते.
जी-मेल किंवा याहू यासारख्या खासगी मेल कंपन्यांवर अकाऊंट तयार करून त्याद्वारे असे ई-मेल येऊ शकतात, असा इशारा प्राप्तीकर विभागाने दिला आहे. प्राप्तीकर विभागाचे ‘@्रल्लूङ्मेी३ं७.ॅङ्म५.्रल्ल’अशा संबोधनाने ई मेल येतात, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बनावट ई मेलमधील फाईल डाऊनलोड करणे टाळावे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आयकरदात्यांनो बनावट ई-मेलपासून सावधान !
जुलै अखेरपर्यंत प्राप्तिकराचे विवरण भरण्यासाठी करदात्यांची धावपळ सुरू
By admin | Updated: July 15, 2014 02:13 IST2014-07-15T02:13:47+5:302014-07-15T02:13:47+5:30
जुलै अखेरपर्यंत प्राप्तिकराचे विवरण भरण्यासाठी करदात्यांची धावपळ सुरू
