Lokmat Money > बिझनेस न्यूज > महासंघाच्या ढोल स्पर्धेत पवन गणेश मंडळ अव्वल

महासंघाच्या ढोल स्पर्धेत पवन गणेश मंडळ अव्वल

महासंघाच्या ढोल स्पर्धेत पवन गणेश मंडळ अव्वल

By admin | Updated: September 2, 2014 23:57 IST2014-09-02T23:57:14+5:302014-09-02T23:57:14+5:30

महासंघाच्या ढोल स्पर्धेत पवन गणेश मंडळ अव्वल

Pawan Ganesh Mandal topped the Federation's Dhol Tournament | महासंघाच्या ढोल स्पर्धेत पवन गणेश मंडळ अव्वल

महासंघाच्या ढोल स्पर्धेत पवन गणेश मंडळ अव्वल

ासंघाच्या ढोल स्पर्धेत पवन गणेश मंडळ अव्वल
औरंगाबाद- जिल्हा परिषद मैदानावर सायंकाळी शेकडो ढोलांचा दणदणाट घुमत होता... एकसाथ एवढे ढोल कोणते पथक वाजवीत आहे. हे पाहण्यासाठी गर्दी जमली होती. एका तालात शेकडो जण ढोल वाजवीत होते. मिनिटामिनिटाला ढोलचा ताल बदलत होता, तसतसा वाजविणार्‍यांमधील उत्साह शिगेला पोहोचत होता. एकसाथ ढोलचा आवाज ऐकून उपस्थितांमध्येही जोश निर्माण होत होता. आपणही जावे आणि ढोल हातात घ्यावा, अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती.
प्रसंग होता गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने आयोजित ढोल स्पर्धेचा. गणेशोत्सवानिमित्त समितीच्या वतीने दररोज विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. मंगळवारी सायंकाळी ढोल स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शहरातील नामांकित मंडळांची ढोलपथके सहभागी झाली. प्रत्येक पथकाला वेळ देण्यात आली होती. त्या वेळेतच जास्तीत जास्त ताल वाजवून दाखविणे अपेक्षित होते. प्रत्येक मंडळाच्या जम्बो ढोल पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. एकसाथ शेकडो ढोलांचा दणदणाट परिसरात घुमत होता. सर्व संघांनी शिस्तीचे दर्शन घडवीत या स्पर्धेत उत्कृष्ट ढोलवादन केले. या स्पर्धेत दिवाणदेवडी येथील पावन गणेश मंडळाच्या पथकाने प्रथम क्रमांक पटकावला. छावणीतील अनिरुद्ध क्रीडा मंडळाला द्वितीय क्रमांक मिळाला. तृतीय क्रमांकाचे बक्षीस विघ्नहर्ता गणेश मंडळ व विघ्नहर्ता क्रीडा मंडळाला विभागून देण्यात आले. संचालन नंदकुमार घोडेले यांनी केले. याप्रसंगी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष प्रमोद राठोड, संदीप शेळके, प्रमोद नरवडे व सर्व पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. यानंतर विजयी संघाने जल्लोष साजरा केला.
कॅप्शन
गणेश महासंघ उत्सव समितीच्या ढोल स्पर्धेत अव्वल ठरलेल्या पावन गणेश मंडळाने असा जल्लोष केला.

Web Title: Pawan Ganesh Mandal topped the Federation's Dhol Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.