Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेटंटचे उल्लंघन; अ‍ॅपलला दंड

पेटंटचे उल्लंघन; अ‍ॅपलला दंड

तंत्रज्ञान कंपनी अ‍ॅपलला पेटंट उल्लंघनाबद्दल ५३.२९ कोटी डॉलरचा दंड भरण्याचा आदेश फेडरल ज्युरींनी दिला आहे. टेक्सासच्या (पूर्व) न्यायालयाला अ‍ॅपलच्या

By admin | Updated: February 27, 2015 00:21 IST2015-02-27T00:21:18+5:302015-02-27T00:21:18+5:30

तंत्रज्ञान कंपनी अ‍ॅपलला पेटंट उल्लंघनाबद्दल ५३.२९ कोटी डॉलरचा दंड भरण्याचा आदेश फेडरल ज्युरींनी दिला आहे. टेक्सासच्या (पूर्व) न्यायालयाला अ‍ॅपलच्या

Patent infringement; Apple's penalties | पेटंटचे उल्लंघन; अ‍ॅपलला दंड

पेटंटचे उल्लंघन; अ‍ॅपलला दंड

ह्यूस्टन : तंत्रज्ञान कंपनी अ‍ॅपलला पेटंट उल्लंघनाबद्दल ५३.२९ कोटी डॉलरचा दंड भरण्याचा आदेश फेडरल ज्युरींनी दिला आहे. टेक्सासच्या (पूर्व) न्यायालयाला अ‍ॅपलच्या आय ट्यून्स सॉफ्टवेअरने तीन पेटंटचे उल्लंघन केल्याचे आढळले.
या पेटंटचा परवाना स्मार्ट फ्लॅशकडे आहे. स्मार्ट फ्लॅशने अ‍ॅपलविरोधात २०१३ मध्ये पेटंट उल्लंघनाची तक्रार दिली होती. या उल्लंघनाबद्दल स्मार्ट फ्लॅशने ८५.२ कोटी डॉलरच्या भरपाईची मागणी केली होती. अ‍ॅपलने निवेदनात म्हटले आहे की, आमच्या कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षांच्या संशोधनानंतर नवा शोध लावला असून आम्ही कोणत्याही प्रकारची भरपाई देणार नाही.
दुर्दैवाने आमच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्यामुळे आम्ही न्यायालयाच्या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार आहोत.

Web Title: Patent infringement; Apple's penalties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.