डंगी होवू नये म्हणून रहा तुळशीच्या सानिध्यातडेंगीची साथ पुण्यात झपाटयाने वाढू लागली आहे. त्यापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने घराजवळ तुळशीचे झाड लावले पाहिजे. तुळस २४ तास ऑक्सिजन सोडत असल्यामुळे त्याच्या सानिध्यात राहणार्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होवून रक्ताभिसरण वाढेल आणि डेंगी आजार होण्यासाठी प्रतिबंध होईल, अशी माहिती डॉ. रविंद्र खाडीलकर यांनी दिली.----------सर्दी-खोकला घालवा काढा पिऊनसर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यांना घरच्या घरी या आजारांना प्रतिबंध करता येवू शकतो. बेल, तुळस, काळी मिरी, लवंग, दालचिनी, सुंठ ठेचून रात्रभर ४ कप पाण्यात ठेवा. सकाळी हे पाणी उकळून त्याचा एक कप करा आणि त्यात गुळ घालून गरम-गरम प्या. यामुळे सर्दी-खोकला कमी होवून दिवसभर उत्साह टिकून राहिल, अस सल्ला डॉ. रविंद्र खाडीलकर यांनी दिला.-------हे करा...* पाणी गाळून, उकळून प्या* बाहेरचे, उघडयावरचे, तळलेले पदार्थ खाऊ नका* आंबट, आंबवलेले पदार्थ खाऊ नका* पावसात भिजू नका, केस ओले ठेवू नका* भिजलेले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नका* पचायला जड जाणारे पदार्थ खाऊ नका* पालेभाज्या खाऊ नये
भाग २ : पुणेकरांचा घसा जाम बातमीसाठी चौकटी
डेंगी होवू नये म्हणून रहा तुळशीच्या सानिध्यात
By admin | Updated: July 12, 2014 22:06 IST2014-07-12T22:06:23+5:302014-07-12T22:06:23+5:30
डेंगी होवू नये म्हणून रहा तुळशीच्या सानिध्यात
