शिलापूर येथील प्रकार; सीईओंकडून कारवाईचे आश्वासन
नाशिक : शिलापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील उपशिक्षिकेविरुद्ध विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ एकवटले असून, या शिक्षिकेची बदली करण्याची मागणी या गावातील ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक व विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना सोमवारी (दि. २२) भेटून केली.
शिलापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षिका रजनी भोसले यांच्याबाबत विद्यार्थ्यांनी बनकर यांच्यासमोरच तक्रारींचा पाढा वाचला. विद्यार्थ्यांकडून मालीश करून घेणे, विद्यार्थ्यांना पालकांना शाळेत न आणण्याची धमकी देणे, काजू-बदाम, कुरकुरे, बिस्किटे, आइस्क्रीम, भेळ आणण्यास सांगणे यांसह विविध तक्रारीच विद्यार्थ्यांनी सांगितल्या. गावातील काही पालकांनी आम्ही याबाबत संबंधित शिक्षिकेला जाब विचारण्यास गेलेल्या एका विद्यार्थ्याच्या आईला या शिक्षिकेने चक्क चावाही घेतल्याची तक्रार पालकांनी केली आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी या ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना या उपशिक्षिकेला शाळेवरून अन्यत्र पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांनाही तशा सूचना देत संबंधित शिक्षिकेला पंचायत समितीच्या मुख्यालयात नियुक्त करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
फोटो कॅप्शन-
२२ पीएचएसपी-८७- एका विद्यार्थ्याला संबंधित शिक्षिकेने वहीने कानाला केलेली मारहाण पाहताना सुखदेव बनकर.
२२ पीएचएसपी-८६- सुखदेव बनकर यांच्याकडे शिक्षिकेच्या तक्रारींचा पाढा वाचताना शिलापूरचे ग्रामस्थ.
शिक्षिकेविरुद्ध वाचला विद्यार्थी अन् पालकांनी तक्रारींचा पाढा
शिलापूर येथील प्रकार; सीईओंकडून कारवाईचे आश्वासन
By admin | Updated: September 23, 2014 00:15 IST2014-09-22T22:44:35+5:302014-09-23T00:15:26+5:30
शिलापूर येथील प्रकार; सीईओंकडून कारवाईचे आश्वासन
