(सविस्तर बातमी आतील पानात घ्यावी)----------------------------गोव्याच्या राज्यपालांचा राजीनामाहेलिकॉप्टर खरेदी घोटाळा : सीबीआयकडून चौकशी, केंद्रीय गृह सचिवांच्या सूचनेनंतर पद सोडलेपणजी : गोव्याचे राज्यपाल भारत वीर वांच्छू यांची अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी सकाळी चौकशी केल्यानंतर त्यांनी अखेर सायंकाळी राष्ट्रपतींकडे राजीनामा सादर केला. वांच्छू यांनी राजीनामा द्यावा, अशी सूचना केंद्रीय गृह सचिवांनी सायंकाळी राज्यपालांना केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा पत्र राष्ट्रपतींच्या कार्यालयास फॅक्स केल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रपतींकडून हे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयास पाठविले जाईल. गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून कोण सूत्रे हाती घेतील ते अजून स्पष्ट झालेले नाही. वांच्छू यांच्या राजीनाम्याची चर्चा काही दिवस होती, अखेर ती खरी ठरली.फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६१ नुसार सीबीआयने शुक्रवारी वांच्छू यांचा साक्षीदार या नात्याने जबाब नोंदविला. माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांचाही सीबीआयने साक्षीदार म्हणून काही दिवसांपूर्वी जबाब घेतला होता. त्यानंतर तीनच दिवसांत नारायणन यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. वांच्छू काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटले होते. या भेटीत त्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली होती, असे समजते. (प्रतिनिधी)------------सीबीआयचे पथक सकाळी अकराच्या सुमारास दोनापावल येथील काबो राजभवनवर आले. तेथे ते राज्यपालांना भेटले. त्यांची काही तास चौकशी केली. --------तीन हजार ६०० कोटींचा व्यवहारवांच्छू निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. राज्यपाल होण्यापूर्वी ते अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या विशेष सुरक्षा दलाचे प्रमुख होते. त्यांच्या काळात म्हणजे २०१० मध्ये बारा हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी अगुस्ता वेस्टलँड कंपनीशी करार झाला होता. एकूण ३ हजार ६०० कोटी रुपयांचा हा व्यवहार होता. या कराराच्या अनुषंगाने दलालीचा आरोप झाल्यावर करार नंतर रद्द केला होता.-------------------आपण दिलेल्या उत्तरांमुळे सीबीआयच्या शंकांचे निरसन झालेले असेल. या प्रकरणी सत्य बाहेर येण्यासाठी सीबीआय शक्य तेवढ्या लवकर चौकशी पूर्ण करील. - भारत वीर वांच्छू
पान -१ पॉईंटर - वांच्छू -
(सविस्तर बातमी आतील पानात घ्यावी)
By admin | Updated: July 4, 2014 22:42 IST2014-07-04T22:42:43+5:302014-07-04T22:42:43+5:30
(सविस्तर बातमी आतील पानात घ्यावी)
