Lokmat Money > बिझनेस न्यूज > पान २ : पवार

पान २ : पवार

(फोटो एसएसपीमध्ये आहे)(जोड भाग दुसर्‍या फाईलमध्ये आहे)

By admin | Updated: October 25, 2014 22:49 IST2014-10-25T22:49:22+5:302014-10-25T22:49:22+5:30

(फोटो एसएसपीमध्ये आहे)(जोड भाग दुसर्‍या फाईलमध्ये आहे)

Page 2: Pawar | पान २ : पवार

पान २ : पवार

(फ
ोटो एसएसपीमध्ये आहे)(जोड भाग दुसर्‍या फाईलमध्ये आहे)
आयपीएस अधिकारी करतोय खाण घोटाळ्याचा अभ्यास
सद्गुरू पाटील/पणजी : प्रवीण पवार हे मुंबईचे. २००३ च्या बॅचचे तरुण आयपीएस अधिकारी. पोलीस अधीक्षक म्हणून यापूर्वी त्यांनी नक्षलग्रस्त भागातही काम केले आहे. प्रतिनियुक्तीवर त्यांना केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या गोवा विभागाचे संयुक्त संचालक म्हणून आणले गेल्यापासून ते गोव्याच्या खाण घोटाळ्याचा अभ्यास करत आहेत. गोव्याच्या खाण घोटाळ्यांतील विविध प्रकारचे बारकावे आता त्यांच्या लक्षात येऊ लागले आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी सोळा खनिज कंपन्या तथा ट्रेडर्स तथा निर्यातदारांना समन्स पाठवले आहे. माजी खाण संचालक अरविंद लोलयेकर यांनाही समन्स पाठवले गेले आहे. मात्र, समन्स जारी करण्यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने व विशेषत: प्रवीण पवार यांनीही खूप होमवर्क केला आहे. दोन कपाटे कागदपत्रांनी भरली आहेत. खनिज खाण कंपन्यांनी २००७ सालापासून खाण क्षेत्रात जे व्यवहार केले आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी पवार यांच्या हाताखाली काम करणार्‍या अधिकार्‍यांच्या टीमने बरीच माहिती गोळा केली आहे. बरीच कागदपत्रे जमविली आहेत. स्वत: पवार यांनीही बरेच कष्ट घेतले आहे. त्यामुळेच यापूर्वी शहा आयोगाच्या व सीईसीच्या अहवालाच्या आधारे मनी लाँडरिंगचा गुन्हा अनेक खाण कंपन्यांविरुद्ध नोंद झाला आहे.
पोलीस खात्याचे काम तरी थोडे सोपे व वरवरचे असते; पण अंमलबजावणी संचालनालयाचे तसे नाही. ते समन्स पाठविण्यापूर्वी व कुठलीही मालमत्ता जप्त करण्यापूर्वी आपल्या कायदा विभागाकडूनही प्रकरणांचा बराच अभ्यास करून घेतात. अंमलबजावणी संचालनालय जेव्हा चौकशी सुरू करते तेव्हा ते प्रकरणाच्या मुळाशी जाते. मनी लाँडरिंगच्या गुन्‘ाबाबत संचालनालय चौकशी करत असून पवार व त्यांची टीम या विषयाच्या मुळाशी जातील, अशी माहिती मिळाली. किती कोटींचे मनी लाँडरिंग खाण घोटाळ्यात गुंतले आहे याचा शोध पवार व त्यांची टीम घेत आहे. अजून अंदाज आलेला नाही.
कोणत्याही वेळी कार्यालयात जाऊन पाहिले तर पवार हे कामात खूप व्यस्त असतात. तुम्ही मोकळ्या वेळेत कोणता छंद जोपासता, असे या प्रतिनिधीने पवार यांना विचारले. छंद जोपासण्यासाठी माझ्याजवळ वेळच नाही. मी सकाळी थोडा जिममध्ये जाऊन येतो तेवढाच. माझा दीड वर्षाचा मुलगा असून त्याच्यासाठीही मला पुरेसा वेळ देता येत नाही, असे एकदा पवार यांनी सहज अनौपचारिकपणे बोलताना सांगितले. गोव्यासह महाराष्ट्रातील अन्य एका भागाचाही ताबा पवार यांच्याकडे आहे. पवार यांच्याजवळ बीई डीग्री आहे. साहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी कर्नाटकच्या एका जिल्‘ात काम सुरू केले होते. चिकमंगळुर, कन्नडा, कोप्पाल जिल्हा, उडपी अशा भागांत त्यांनी पोलीस खात्याच्या सेवेत असताना कामगिरी बजावली. आता त्यांनी पूर्णपणे गोव्याच्या खाण घोटाळ्यावर व त्यातील मनी लाँडरिंगच्या प्रकरणावर लक्ष केंद्रित केले आहे.

Web Title: Page 2: Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.