- जी-माजी पंचायतमंत्री, संचालकांविरुध्द कारवाईची मागणी पणजी : जिल्हा पंचायत निवडणुका घिसाडघाईने घेतल्या जात असून तीन महिन्यांआधी म्हणजेच १५ जानेवारीपूर्वी प्रक्रिया सुरू होणे आवश्यक असताना केवळ २८ दिवस आधी ती सुरू करण्यात आली आणि राज्य निवडणूक आयोगाने जनतेकडून हरकती, सूचनाही मागविल्या नाहीत. राखीवता तसेच मतदारसंघ पुनर्रचनेचा घोळ घालण्यात आला, असा आरोप करीत सुदीप ताम्हणकर यांनी दक्षता खात्याकडे यासंबंधीची तक्रार केली आहे. या बाबतीत भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय व्यक्त करून आजी-माजी मुख्यमंत्री, पंचायत राजमंत्री, पंचायत सचिव तसेच मुख्य २00७ पासून पंचायत खात्याचे संचालकपद भूषविलेल्या अधिकार्यांच्या चौकशीची मागणी ताम्हणकर यांनी केली आहे. घटनेतील तरतुदींना हरताळ फासण्यात आला असून केंद्राचे निर्देशही पाळलेले नाहीत. राज्य निवडणूक आयोगाची भूमिकाही या सर्व बाबतीत संशयास्पद आहे. केवळ ही निवडणूकच नव्हे तर २0१२ साली झालेली जिल्हा पंचायत निवडणूकही बेकायदा आहे, असा त्यांचा दावा आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, २00७ पासून आजतागायत पंचायत मंत्रिपदी राहिलेले बाबू आजगावकर, पार्सेकर, दयानंद मांद्रेकर, सचिवपद भूषविलेले व्ही. के. झा, पी. मॅथ्यु सॅम्युअल यांची तसेच या काळात पंचायत संचालकपद भूषविलेल्या सर्वांची गुन्हे नोंदवून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी) फोटोताम्हणकर
पान २ : जि. पं. मतदारसंघ पुनर्रचना, राखीवता घोळ प्रकरणी दक्षता खात्याकडे तक्रार
- आजी-माजी पंचायतमंत्री, संचालकांविरुध्द कारवाईची मागणी
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:17+5:302015-03-06T23:07:17+5:30
- आजी-माजी पंचायतमंत्री, संचालकांविरुध्द कारवाईची मागणी
