Lokmat Money > बिझनेस न्यूज > पान १ - अमित शहांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची बदली

पान १ - अमित शहांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची बदली

मुजफ्फरनगर : कथितरीत्या प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध आरोपपत्र तयार करणार्‍या उत्तर प्रदेशच्या दोघा पोलीस अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे़ ही नियमित बदली असून त्याचा अमित शहा प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी केला आहे. तरीही या बदल्यांमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या अहेत.

By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:52+5:302014-10-04T22:55:52+5:30

मुजफ्फरनगर : कथितरीत्या प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध आरोपपत्र तयार करणार्‍या उत्तर प्रदेशच्या दोघा पोलीस अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे़ ही नियमित बदली असून त्याचा अमित शहा प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी केला आहे. तरीही या बदल्यांमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या अहेत.

Page 1 - Transfers of police officers who filed chargesheets against Amit Shah | पान १ - अमित शहांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची बदली

पान १ - अमित शहांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची बदली

जफ्फरनगर : कथितरीत्या प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध आरोपपत्र तयार करणार्‍या उत्तर प्रदेशच्या दोघा पोलीस अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे़ ही नियमित बदली असून त्याचा अमित शहा प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी केला आहे. तरीही या बदल्यांमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या अहेत.
लोकसभा निवडणुकीच्या काळात पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, शहांविरुद्ध आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला होता़ तपास अधिकारी उपनिरीक्षक भरत लाल यांनी प्रकरणाचा तपास केला होता तर पोलीस अधीक्षक योगेन्द्र सिंह यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते़ तथापि आरोपपत्र कायद्याच्या दृष्टीने सदोष असल्याचे नमूद करत येथील न्यायालयाने ते नाकारले होते़ आयोगाने ४ एप्रिल २०१४ रोजी शहांवर उत्तर प्रदेशात प्रचार करण्यावर बंदी आणली होती़ या पार्श्वभूमीवर या दोन्ही अधिकार्‍यांच्या बदलीबाबत संशयाच्या नजरेतून पाहिले जात आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Page 1 - Transfers of police officers who filed chargesheets against Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.