Lokmat Money > बिझनेस न्यूज > पान १ - राणे

पान १ - राणे

विदर्भ राज्याला काँग्रेसचा

By admin | Updated: August 22, 2014 22:11 IST2014-08-22T22:11:26+5:302014-08-22T22:11:26+5:30

विदर्भ राज्याला काँग्रेसचा

Page 1 - Rane | पान १ - राणे

पान १ - राणे

दर्भ राज्याला काँग्रेसचा
विरोध नाही : राणे
-काँग्रेसच्या प्रचाराचा
प्रारंभ १ सप्टेंबरपासून
मुंबई - विदर्भ राज्याच्या निर्मितीला काँग्रेस पक्षाचा विरोध नाही, असे उद्योगमंत्री आणि प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आज जाहीर केले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यावेळी उपस्थित होते.
काँग्रेसच्या प्रचार समितीची पहिली बैठक आज (शुक्रवारी) झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे राणे यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, वेगळा विदर्भ झाला तर आमचा विरोध नसेल. केंद्र सरकारला त्याबाबत निर्णय घेऊ द्या, त्यावेळी पक्ष आपली भूमिका मांडेलच. काँग्रेसच्या नेत्यांनी विदर्भ राज्याच्या आंदोलनात भाग घ्यायला आमची हरकत नाही, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ १ सप्टेंबर रोजी मुंबईतील हुतात्मा स्मारकापासून १ सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती राणे यांनी दिली.
महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी येणार का या प्रश्नात ते म्हणाले की याचा निर्णय काँग्रेसश्रेष्ठी घेतील. आम्ही तशी मागणी करणार नाही.
राणे यांचे पुत्र निलेश यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याविरुद्ध प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर राणे म्हणाले, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. लोकसभेचे पडसाद काही ना काही प्रमाणात उमटतीलच. जाधव यांनी आपल्याला प्रचाराला बोलावले तर त्यावेळी काय तो निर्णय घेऊ. सुभाष बने, गणपत कदम हे राणे समर्थक माजी आमदार लवकरच शिवसेनेत जाणार असल्याच्या वृत्ताबाबत ते म्हणाले, अशा लोकांची मी दखल घेत नाही. (विशेष प्रतिनिधी)
-------------------------------------------------
काँग्रेस कार्यकर्ते मशाली नेणार
हुतात्मा स्मारकाजवळ १ सप्टेंबर रोजी उपस्थित कार्यकर्ते आपापल्या भागात मशाली नेतील आणि मिरवणुका काढून काँग्रेस कुठल्या मुद्यांवर निवडणूक लढणार ते जनतेला सांगतील. आघाडी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासाची अनेक कामे, अच्छे दिन आएंेगे, असे स्वप्न दाखविणार्‍या भाजपा-शिवसेना महायुतीचा फोलपणा मतदारांना सांगतील. विरोधकांच्या थापांचे पितळ उघडे पाडतील, अशी माहिती राणे यांनी दिली.

Web Title: Page 1 - Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.