वज संकटावर मुख्य सचिवांची समितीमुंबई-खासगी वीज कंपन्यांनी वीज निर्मितीबाबत आस्ते कदम भूमिका घेतल्याने महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वीज संकटावर तोडगा काढण्याकरिता राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.खासगी वीज निर्मिती करणार्या कंपन्यांनी वीज निर्मिती संथ केली असल्याने महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, पंजाब अशा अनेक राज्यांसमोर वीज संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे लोडशेडींगचे संकट निर्माण झाले आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यावर पर्याय म्हणून दाभोळ प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करून महागडी वीज पुरवणे, बाजारातून ज्या दराने मिळेल ती वीज खरेदी करणे अथवा लोडशेडींग सुरु करणे हे तीन पर्याय असल्याचे वास्तव पुढे आले. याबाबत निर्णय घेण्याकरिता राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचे ठरले. (विशेष प्रतिनिधी)
पान १ वीज जोड वा फ्लायर शेजारी
वीज संकटावर मुख्य सचिवांची समिती
By admin | Updated: August 28, 2014 23:09 IST2014-08-28T23:09:49+5:302014-08-28T23:09:49+5:30
वीज संकटावर मुख्य सचिवांची समिती
