पट्रोल ५४ पैशांनी स्वस्तडिझेल : पंतप्रधान मायदेशी परतल्यानंतर होणार निर्णयनवी दिल्ली : पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५४ पैशांची कपात मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. यामध्ये स्थानिक करांचा समावेश नसल्याने प्रत्यक्षात ही कपात ६८ पैशांपर्यंत असेल. डिझेलच्या दरातील कपातीचा निर्णय मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौर्यावरून मायदेशी येईपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात घसरणीचा कल असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कपात करण्यात आली आहे. गेल्या ३१ ऑगस्ट रोजी पेट्रोलचा भाव दीड रुपयांनी कमी करण्यात आला होता.जानेवारी २००९ नंतर प्रथमच डिझेल दरकपात होणार असे सांगण्यात आले होते. तथापि, आज हा निर्णय टाळण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौर्यावरून मायदेशी परतल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे, असे सुत्रांनी सांगितले. दरकपातीचा निर्णय झाला असता तर डिझेल पाच वर्षांत प्रथमच स्वस्त झाले असते.तेलाची खरेदी किंमत आणि किरकोळ विक्रीची किंमत यातील तफावत कमी होत होत संपली आहे. १६ सप्टेंबरपासून लिटरमागे ३५ पैशांचा नफा कंपन्यांना मिळू लागला होता. हा नफा आता प्रतिलिटर जवळपास १ रुपया झाला आहे. खरे म्हणजे सप्टेंबरच्या मध्यातच पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करता आल्या असत्या; पण सरकारने तेव्हा ते टाळले होते. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, १७ जानेवारी २0१३ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने तोटा भरून काढण्यासाठी डिझेलच्या किमतीत दर महिन्याला ४0 ते ५0 पैशांची वाढ करण्याचा अधिकार दिला होता. पेट्रोल-डिझेलची विक्री नफ्यात येऊ शकते, याचा विचारच तेव्हा केला गेला नव्हता. खाजगी तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलची विक्री आंतरराष्ट्रीय किमतीच्या अनुषंगाने करतात. त्यामुळे खाजगी पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल यापूर्वीच स्वस्त झाले आहे. सरकारी कंपन्यांना आपला बाजार हिस्सा टिकविण्यासाठी दरकपात करणे आवश्यक बनले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पान१ : पेट्रोल दर कपात
पेट्रोल ५४ पैशांनी स्वस्त
By admin | Updated: October 1, 2014 00:05 IST2014-10-01T00:05:39+5:302014-10-01T00:05:39+5:30
पेट्रोल ५४ पैशांनी स्वस्त
