ल्ष्मणराव ढोबळेंवर बलात्काराचा गुन्हा दाखलमुंबई : अश्लिल फोटो लोकांपुढे आणेन, अशी धमकी देत माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण ढोबळे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने बोरिवली पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीची दखल घेत बोरीवली पोलिसांनी ढोबळेंविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. बोरिवली येथील गोराई परिसरात शाहू शिक्षण संस्थेचे सदस्य व आमदार लक्ष्मण ढोबळेंचे नालंदा महाविद्यालय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला याच महाविद्यालयात कर्मचारी आहे. ढोबळे यांनी तीनवेळा बलात्कार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे़ २०११ ते २०१३ या काळात ढोबळे संध्याकाळी महाविद्यालयात कोणी नसताना इमारत बांधकामाच्या निमित्ताने आले होते. त्यांनी मुख्यध्यापकांच्या केबीनमध्ये बोलावून जबरदस्ती केली. प्रतिकार केला तेव्हा जबर मारहाणही केल्याचा आरोप महिलेने केला आहे़ बोरिवली पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेत ढोबळेंविरोधात कलम ३७६, ३२३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू असून त्यानंतरच योग्य ती कारवाई करण्यात येईल असे परिमंडळ बाराचे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़आरोप खोटे, आकसापोटीतक्रारदार महिलेने संस्थेतील कर्मचार्यांच्या पगाराचा ५५ लाख रुपयांचा अपहार केला़ त्याबद्दल पोलिसांत तक्रार दिली होती़ तिला अटक झाली़ मग तिने आता हे आरोप केले आहेत़ दरमहा पंधरा हजार रुपये पगार घेणारी ही महिला तीन फ्लॅट आणि एक हॉटेल कशी काय खरेदी करु शकते़ त्यामुळे स्वत:ने केलेले अपहार उघड झाल्यानंतर अशा प्रकारचे चारित्र्यहनन करणारे आरोप करणे हे अध:पतन आहे़- लक्ष्मण ढोबळे, माजी मंत्री
पान १ -लक्ष्मण ढोबळेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल
लक्ष्मणराव ढोबळेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल
By admin | Updated: September 13, 2014 23:00 IST2014-09-13T23:00:03+5:302014-09-13T23:00:03+5:30
लक्ष्मणराव ढोबळेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल
