पान 1- चीन करणार तीन लाख सैनिकांची कपात
By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:38+5:302015-09-03T23:05:38+5:30

पान 1- चीन करणार तीन लाख सैनिकांची कपात
>बीजिंग : 2.3 दशलक्ष सैनिकांपैकी तीन लाख सैनिकांची कपात करण्याची घोषणा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिपिंग यांनी गुरुवारी केली. दुसर्या महायुद्धात जपानविरुद्ध मिळविलेल्या विजयाच्या 70 व्या स्मृती समारोहानिमित्त चीनने आपल्या लष्करी सार्मथ्याचे जगापुढे प्रदर्शन केले. त्याचवेळी त्यांनी ही घोषणा केली. सैनिकांच्या संख्येत कपात करतानाच लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर देत चीनने लष्करी सार्मथ्यात वाढच केली आहे. चीनचा अनेक आग्नेय आशियाई देशांशी वाद सुरू आहे. या आग्नेय आशियाई देशांना अमेरिकेचा पाठिंबा आहे. पूर्व चिनी सागरात चीनचा जपानशीही वाद सुरू आहे. भारत-भूतान यांच्यासोबतही चीनचा सीमा वाद आहे. या पार्श्वभूमीवर चीनने केलेले शक्तिप्रदर्शन सूचक मानले जात आहे. 1980 पासून वेगवेगळ्य़ा टप्प्यांवर चौथ्यांदा चीनने सैनिकांच्या संख्येत कपात केली आहे. बीजिंगमधील लष्करी शक्तिप्रदर्शनवजा संचलनाला दक्षिण कोरिया आणि रशियाचे अध्यक्ष, युनोचे सरचिटणीस बान की मून, भारताचे विदेश राज्यमंत्री जन. व्ही. के. सिंग यांच्यासह 30 देशांचे नेते उपस्थित होते.यावेळी शक्तिप्रदर्शन करताना 80 टक्के लष्करी सामग्री संचलनात जगासमोर आणण्यात आली. पाकिस्तान आणि रशियासह 17 देशांच्या एक हजार विदेशी सैनिकांनी संचलनात सहभाग नोंदविला. 200 लढाऊ विमानांनी अवकाशात कवायती केल्या. माजी अध्यक्ष जियांग जेमिन, हू जिंताओ आणि माजी पंतप्रधान वेन जिआबाओ यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. त्याचबरोबर रशियाचे अध्यक्ष पुतीन, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क-जीन-हाई, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस