Lokmat Money > बिझनेस न्यूज > पान१/अभिनेते सदाशिव अमरापूकर अत्यवस्थ

पान१/अभिनेते सदाशिव अमरापूकर अत्यवस्थ

सदाशिव अमरापूरकर

By admin | Updated: October 25, 2014 22:49 IST2014-10-25T22:49:43+5:302014-10-25T22:49:43+5:30

सदाशिव अमरापूरकर

Page 1 / Actor Sadashiv Amrapurkar is extremely worried | पान१/अभिनेते सदाशिव अमरापूकर अत्यवस्थ

पान१/अभिनेते सदाशिव अमरापूकर अत्यवस्थ

ाशिव अमरापूरकर
फुप्फुस संसर्गाने अत्यवस्थ
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते व समाजसेवक सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. फुप्फुसाला संसर्ग झाल्याने अंधेरीच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६३ वर्षांच्या अमरापूरकर यांच्या फुप्फुसाला संसर्ग झाला आहे. त्यांना श्वास घेताना त्रास होत आहे. या त्रासामुळे दोन आठवड्यांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तूर्तास त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
त्यांची श्वसनसंस्था योग्यरीतीने कार्यरत नाही. त्यांची प्रकृती स्थिर व्हावी, म्हणून तज्ञ डॉक्टरांचे पथक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
---कोट---
बाबांची प्रकृती आता स्थिर आहे. मधुमेह बळावल्यामुळे त्यांच्या फुप्फुसाला संसर्ग झाला आहे. त्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा, अशी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहोत.
- रीमा अमरापूरकर ,सदाशिव अमरापूरकर यांची कन्या

Web Title: Page 1 / Actor Sadashiv Amrapurkar is extremely worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.