Lokmat Money > बिझनेस न्यूज > सीडीसह इतर आवृत्तीकरिता : सहा मोबाईल टॉवर कुलूपबंद; सेवा विस्कळीत महापालिकेची कारवाई

सीडीसह इतर आवृत्तीकरिता : सहा मोबाईल टॉवर कुलूपबंद; सेवा विस्कळीत महापालिकेची कारवाई

अकोला: व्यावसायिक संकुल, रहिवासी इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्याचे नवीन निकष पायदळी तुडविणार्‍या विविध मोबाईल कंपन्यांचे सहा टॉवर सील (कुलूपबंद) करण्याची कारवाई ११ सप्टेंबर रोजी मनपा प्रशासनाने केली. यामुळे शहरातील भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत झाली. दुपारी ३ वाजेनंतर मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:01+5:302014-09-11T22:31:01+5:30

अकोला: व्यावसायिक संकुल, रहिवासी इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्याचे नवीन निकष पायदळी तुडविणार्‍या विविध मोबाईल कंपन्यांचे सहा टॉवर सील (कुलूपबंद) करण्याची कारवाई ११ सप्टेंबर रोजी मनपा प्रशासनाने केली. यामुळे शहरातील भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत झाली. दुपारी ३ वाजेनंतर मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

For other versions of CDs: 6 Mobile Tower Locking; Operation of Municipal Corporation Disrupted | सीडीसह इतर आवृत्तीकरिता : सहा मोबाईल टॉवर कुलूपबंद; सेवा विस्कळीत महापालिकेची कारवाई

सीडीसह इतर आवृत्तीकरिता : सहा मोबाईल टॉवर कुलूपबंद; सेवा विस्कळीत महापालिकेची कारवाई

ोला: व्यावसायिक संकुल, रहिवासी इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्याचे नवीन निकष पायदळी तुडविणार्‍या विविध मोबाईल कंपन्यांचे सहा टॉवर सील (कुलूपबंद) करण्याची कारवाई ११ सप्टेंबर रोजी मनपा प्रशासनाने केली. यामुळे शहरातील भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत झाली. दुपारी ३ वाजेनंतर मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
मोबाईल टॉवर उभारण्यासंदर्भात राज्य शासनाने नवीन नियमावली लागू केली. तसे आदेश महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले. शहराच्या विविध भागात उभारण्यात आलेल्या ११५ मोबाईल टॉवरपैकी फक्त ७० टॉवरला मनपाकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली. उर्वरित २५ टॉवर बेकायदेशीर असून, विविध त्रुट्या असल्यामुळे १८ टॉवरचे प्रकरण प्रलंबित आहे. संबंधित कंपन्यांनी नवीन नियमावलीनुसार मोबाईल टॉवरचे नूतनीकरण करणे आवश्यक असताना व मनपाने कंपन्यांना नोटीस जारी केल्यावरदेखील त्याकडे मोबाईल कंपन्यांनी पाठ फिरवली. या पृष्ठभूमीवर सहाय्यक नगर रचनाकार संदीप गावंडे, दक्षिण झोनचे क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे यांनी दक्षिण झोनमधील विविध कंपन्यांचे सहा मोबाईल टॉवर सील केले. टॉवर सील केल्यामुळे शहरातील भ्रमणध्वनी सेवा खंडित झाली आहे.

Web Title: For other versions of CDs: 6 Mobile Tower Locking; Operation of Municipal Corporation Disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.