अोला : दरवर्षीप्रमाणे यंदाही नालंदा ॲकेडमीद्वारा ५०० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.चार महिने कालावधीच्या या प्रशिक्षण वर्गामध्ये रेल्वे, बँक, पोलिस, तलाठी, ग्रामसेवक, एम.पी.एस.सी., डी.एड. सीईटी ई स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमापन, जनरल तसेच अभियोग्यता क्षमता चाचणी, व्यक्तिमत्त्व विकास, मानसशास्त्र ई. विषयांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. ॲकेडमीने सुविधेकरिता सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत दर दोन तासांनी बॅचेस ठेवल्या आहेत.यापूर्वी देखील नालंदातर्फे स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन, पोलिस भरती, पी.एस.आय. पूर्व परीक्षा, पीएमटी-पीईटी क्रॅश कोर्सचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून, शेकडो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.वरील मोफत प्रशिक्षण वर्गाला कमीत कमी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असून ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख ३० ऑगस्ट आहे. या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व अधिक माहितीस्तव नालंदा ॲकेडमीच्या सिव्हिल लाईन रोडवरील हर्ष संकुल स्थित कार्यालयाशी संपर्क करावा, असे संचालक प्रा.चंदू सिरसाट कळवितात.
नालंदा ॲकेडमीतर्फे मोफत स्पर्धा परीक्षा क्लासेसचे आयोजन
अकोला : दरवर्षीप्रमाणे यंदाही नालंदा ॲकेडमीद्वारा ५०० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:23+5:302014-08-25T21:40:23+5:30
अकोला : दरवर्षीप्रमाणे यंदाही नालंदा ॲकेडमीद्वारा ५०० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
