नवी दिल्ली : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ कंपन्यांना २,५४५ कोटी रुपयांचा दंड लावल्यानंतर भारतीय स्पर्धा आयोगाने यामुळे वाहन सुटे भाग बाजार ग्राहकांसाठी स्वस्त होईल, असे संकेत दिले. आयोगाने सोमवारी सुटे भाग आणि विक्रीनंतर सेवा देण्याबाबत अयोग्य व्यवहार केल्याप्रकरणी या कार कंपन्यांना दंड ठोठावला होता.
आयोगाचे अध्यक्ष अशोक चावला यांनी सांगितले की, सुटे भाग आणि दुरुस्ती बाजार अधिक व्यापक करणे हा आमचा उद्देश आहे. बाजार ग्राहकाभिमुख व त्यांना परवडेल असा असावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. दंड लावण्यासोबतच स्पर्धा आयोगाने कार कंपन्यांना स्पर्धेला अडथला होईल, असा व्यवहार करू नये, असेही सुनावले. येथे उद्योग संघटना अॅसोचॅमने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘त्या’ आदेशाने स्वस्त होईल कार सुटे भाग बाजार
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ कंपन्यांना २,५४५ कोटी रुपयांचा दंड लावल्यानंतर भारतीय स्पर्धा आयोगाने यामुळे वाहन सुटे भाग बाजार ग्राहकांसाठी स्वस्त होईल, असे संकेत दिले
By admin | Updated: August 30, 2014 03:41 IST2014-08-30T03:41:20+5:302014-08-30T03:41:20+5:30
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ कंपन्यांना २,५४५ कोटी रुपयांचा दंड लावल्यानंतर भारतीय स्पर्धा आयोगाने यामुळे वाहन सुटे भाग बाजार ग्राहकांसाठी स्वस्त होईल, असे संकेत दिले
