Lokmat Money > बिझनेस न्यूज > केंद्रीय पेन्शनरांना आधार क्रमांक सादर करण्याचे आदेश

केंद्रीय पेन्शनरांना आधार क्रमांक सादर करण्याचे आदेश

केंद्र सरकारच्या सगळ्या सेवानिवृत्ती-धारकांना पेन्शन मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये व ती मिळविण्यात उशीर होऊ नये म्हणून त्यांना

By admin | Updated: April 7, 2015 01:07 IST2015-04-07T01:07:37+5:302015-04-07T01:07:37+5:30

केंद्र सरकारच्या सगळ्या सेवानिवृत्ती-धारकांना पेन्शन मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये व ती मिळविण्यात उशीर होऊ नये म्हणून त्यांना

Order to submit Aadhaar numbers to central pensioners | केंद्रीय पेन्शनरांना आधार क्रमांक सादर करण्याचे आदेश

केंद्रीय पेन्शनरांना आधार क्रमांक सादर करण्याचे आदेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सगळ्या सेवानिवृत्ती-धारकांना पेन्शन मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये व ती मिळविण्यात उशीर होऊ नये म्हणून त्यांना त्यांच्या आधारकार्डचा क्रमांक बँक खात्याशी जोडण्यास सांगण्यात आले आहे.
सगळे पेन्शनर्स किंवा कुुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांनी त्यांच्या आधारकार्डचा क्रमांक पेन्शन देणाऱ्या अधिकाऱ्यांना द्यावा, असे कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन्स मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. ही माहिती लवकरात लवकर द्यावी म्हणजे नोव्हेंबर २०१५ मध्ये हयातीचे प्रमाणपत्र सादर करताना गैरसोय टाळता येईल. कोणत्याही त्रासाशिवाय व गैरसोयीशिवाय पेन्शन मिळण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.
आधार कार्डसंदर्भात सक्ती करण्यात येऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिले होते. असे असतानाही विविध योजनांसाठी आधार जोडणी करणे सरकारी पातळीवर सुरूच असल्याचे दिसून येते. सेवानिवृत्तांना आधारकार्डचा क्रमांक देण्याबाबत देण्यात आलेल्या सूचना त्याचाच भाग आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Order to submit Aadhaar numbers to central pensioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.