Lokmat Money > बिझनेस न्यूज > करनूर येथील रस्ता खुला करावा

करनूर येथील रस्ता खुला करावा

कागल : करनूर (ता. कागल) येथील मेनन शेती आणि घाटगे कोडमध्ये अडविण्यात आलेला शेतपाणंद रस्ता त्वरित खुला करावा, या मागणीचे निवेदन या परिसरातील शेतकर्‍यांनी तहसीलदार शांताराम सांडे यांना दिले. गट नं. ४५० आणि गट नं. ४४६ मध्ये हा रस्ता बंद करण्यात आला आहे.

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:11+5:302014-11-21T22:38:11+5:30

कागल : करनूर (ता. कागल) येथील मेनन शेती आणि घाटगे कोडमध्ये अडविण्यात आलेला शेतपाणंद रस्ता त्वरित खुला करावा, या मागणीचे निवेदन या परिसरातील शेतकर्‍यांनी तहसीलदार शांताराम सांडे यांना दिले. गट नं. ४५० आणि गट नं. ४४६ मध्ये हा रस्ता बंद करण्यात आला आहे.

Open the road in Karanur | करनूर येथील रस्ता खुला करावा

करनूर येथील रस्ता खुला करावा

गल : करनूर (ता. कागल) येथील मेनन शेती आणि घाटगे कोडमध्ये अडविण्यात आलेला शेतपाणंद रस्ता त्वरित खुला करावा, या मागणीचे निवेदन या परिसरातील शेतकर्‍यांनी तहसीलदार शांताराम सांडे यांना दिले. गट नं. ४५० आणि गट नं. ४४६ मध्ये हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
करनूर गायरान जमिनीतून निघालेला हा रस्ता शेतपाणंद आहे. तो मत्तीवडे (कर्नाटक) या गावाला जाऊन मिळतो. महसूल विभागाच्या नकाशामध्ये तो स्पष्टपणे दाखविण्यात आलेला आहे. मात्र, या गट क्रमांकाच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊन शेतजमिनीचे तुकडे झालेले आहेत. त्यातून कोणत्या हद्दीतून रस्ता सोडायचा, हा प्रश्न तयार होऊन हा रस्ता अडविण्याचा प्रकार झाला आहे. महिन्याभरापूर्वी मेनन यांच्या हद्दीत हा रस्ता दगड-धोंडे टाकून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ये-जा करण्यात अडचणी झाल्या आहेत. तसेच सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. या परिसरात सर्वत्र उसाचेच पीक आहे. त्यामुळे उसाची वाहतूक करण्यास रस्ता नसल्याने अनेक शेतकर्‍यांच्या ऊसतोडी परत गेल्या आहेत. तरी तहसीलदार, तलाठी यांनी यामध्ये लक्ष घालून रस्ता पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर तेजपाल चौगुले, रत्नाबाई साळोखे, मिरासोा शेख, प्रवीण कांबळे, मारुती पाटील, भाऊसोा नलवडे आदींच्या स‘ा आहेत.

Web Title: Open the road in Karanur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.