Lokmat Money > बिझनेस न्यूज > कॉल ड्रॉपसाठी केवळ कंपन्या जबाबदार नाहीत

कॉल ड्रॉपसाठी केवळ कंपन्या जबाबदार नाहीत

कॉल ड्रॉपबद्दल दूरसंचार कंपन्यांना उद्योग मंडळ असोचेमने पाठिंबा दिला आहे. कॉल ड्रॉपसाठी फक्त कंपन्यांना दोष देता येणार नाही, तर स्पेक्ट्रम आणि मनोऱ्यांचीही त्यात भूमिका असते

By admin | Updated: July 31, 2015 01:58 IST2015-07-31T01:58:39+5:302015-07-31T01:58:39+5:30

कॉल ड्रॉपबद्दल दूरसंचार कंपन्यांना उद्योग मंडळ असोचेमने पाठिंबा दिला आहे. कॉल ड्रॉपसाठी फक्त कंपन्यांना दोष देता येणार नाही, तर स्पेक्ट्रम आणि मनोऱ्यांचीही त्यात भूमिका असते

Only companies are not responsible for the call drop | कॉल ड्रॉपसाठी केवळ कंपन्या जबाबदार नाहीत

कॉल ड्रॉपसाठी केवळ कंपन्या जबाबदार नाहीत

नवी दिल्ली : कॉल ड्रॉपबद्दल दूरसंचार कंपन्यांना उद्योग मंडळ असोचेमने पाठिंबा दिला आहे. कॉल ड्रॉपसाठी फक्त कंपन्यांना दोष देता येणार नाही, तर स्पेक्ट्रम आणि मनोऱ्यांचीही त्यात भूमिका असते, असे असोचेमचे म्हणणे आहे.
कॉल ड्रॉपची परिस्थिती निर्माण व्हायला अनेक कारणे जबाबदार आहेत व त्यांच्यावर या कंपन्यांचे काहीही नियंत्रण नाही, असे असोचेमच्या दूरसंचार परिषदेचे अध्यक्ष टी.व्ही. रामचंद्रन यांनी सांगितले. सेल्युलर नेटवर्कची स्थापना झाल्यानंतर पुरेसे स्पेक्ट्रम नसेल किंवा मनोऱ्यांचेही पुरेसे नेटवर्क नसेल, तर कॉल ड्रॉप होऊ शकतो. पुरेसे नेटवर्क उपलब्ध न झाल्यास सेवा क्षेत्रात सिग्नल मिळण्यास अडचणी येतात, असे रामचंद्रन म्हणाले.

Web Title: Only companies are not responsible for the call drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.