Lokmat Money > बिझनेस न्यूज > २००५ पूर्वीच्या नोटा बदलण्यासाठी फक्त १० दिवस

२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्यासाठी फक्त १० दिवस

तुमच्याकडे २००५ पूर्वीच्या चलनी नोटा असतील तर त्या बदलण्यासाठी आता फक्त दहा दिवसांचाच अवधी उरला आहे. या जुन्या चलनी नोटा

By admin | Updated: June 21, 2015 23:48 IST2015-06-21T23:48:15+5:302015-06-21T23:48:15+5:30

तुमच्याकडे २००५ पूर्वीच्या चलनी नोटा असतील तर त्या बदलण्यासाठी आता फक्त दहा दिवसांचाच अवधी उरला आहे. या जुन्या चलनी नोटा

Only 10 days to change the currency before 2005 | २००५ पूर्वीच्या नोटा बदलण्यासाठी फक्त १० दिवस

२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्यासाठी फक्त १० दिवस

नवी दिल्ली : तुमच्याकडे २००५ पूर्वीच्या चलनी नोटा असतील तर त्या बदलण्यासाठी आता फक्त दहा दिवसांचाच अवधी उरला आहे. या जुन्या चलनी नोटा बदलण्याची मुदत ३० जून रोजी संपत आहे. यात ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटांचाही समावेश आहे.
२००५ पूर्वीच्या चलनी नोटा असतील तर त्या एक तर बँकेतील खात्यात जमा कराव्यात किंवा बँकेच्या शाखेला बदलण्यास सांगावे, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. या चलनी नोटा बदलण्याची अंतिम मुदत आधी १ जानेवारी होती.
त्यानंतर ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली. या नोटांच्या मागील बाजूस छपाईची तारीख नाही, तसेच २००५ नंतरच्या चलनी नोटांच्या तुलनेत सुरक्षेच्या दृष्टीने खास वैशिष्ट्येही नाहीत. २००५ पूर्वीच्या चलनी नोटा चलनातून रद्द करण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीयस्तरावरही या नोटा बाद करण्यात येणार
आहेत.
जानेवारीत संपलेल्या १३ महिन्यांत रिझर्व्ह बँकेच्या विभागीय कार्यालयात २००५ पूर्वीच्या १६४ कोटी नोटा जमा करण्यात आल्या होत्या. त्यांचे एकूण मूल्य २१,७५० कोटी रुपये असून यात ५०० आणि १ हजाराच्या नोटांचाही समावेश
आहे.

Web Title: Only 10 days to change the currency before 2005

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.