Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आॅनलाईन वित्तीय व्यवहार ९५ लाख कोटी रुपयांवर

आॅनलाईन वित्तीय व्यवहार ९५ लाख कोटी रुपयांवर

ग्राहकांचा विश्वास, यामुळे देशात आॅनलाईन पेमेंटच्या प्रक्रियेत गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे

By admin | Updated: May 30, 2015 00:02 IST2015-05-30T00:02:02+5:302015-05-30T00:02:02+5:30

ग्राहकांचा विश्वास, यामुळे देशात आॅनलाईन पेमेंटच्या प्रक्रियेत गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे

Online financial transaction Rs 950 lakh crore | आॅनलाईन वित्तीय व्यवहार ९५ लाख कोटी रुपयांवर

आॅनलाईन वित्तीय व्यवहार ९५ लाख कोटी रुपयांवर

मुंबई : आॅनलाईन आणि मोबाईल बँकिंग प्रणालीला लाभलेले बळकट सुरक्षा कवच आणि याच अनुषंगाने ग्राहकांचा विश्वास, यामुळे देशात आॅनलाईन पेमेंटच्या प्रक्रियेत गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात आॅनलाईन वित्तीय व्यवहारांनी ९५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
एका अग्रगण्य संस्थेने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणानुसार, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एनईएफटीच्या माध्यमातून होेणारे पैशाचे आॅनलाईन ट्रान्स्फर, मोबाईल व्हॅलेट या माध्यमातून हे व्यवहार झाले आहेत. आॅनलाईन व्यवहारांची संख्या वाढण्यामागची कारणमीमांसा करताना सांगितले की, आॅनलाईन वित्तीय व्यवहारांची सुविधा देणाऱ्या विविध कंपन्यांनी आॅनलाईन प्रणाली अधिक सुरक्षित केली आहे, तसेच या संदर्भात लोकांमध्येही जागरूकता वाढली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, गेल्या वर्षभरात अनेक ई-कॉमर्स कंपन्या भारतात दाखल झाल्या. या सर्व कंपन्यांतर्फे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नियमितपणे सूट योजनांची घोषणा होते. याला प्रतिसादही उत्तम लाभतो. ग्राहकांना हा व्यवहार आॅनलाईन प्रणालीद्वारे पूर्ण करावा लागतो. त्यामुळे लोकांना ही प्रणाली आता अवगत होत असून यावरील विश्वासही वाढत आहे.

Web Title: Online financial transaction Rs 950 lakh crore