Lokmat Money > बिझनेस न्यूज > आॅनलाईन बँकिंग व्यवहार व्हायरसच्या जाळ्यात

आॅनलाईन बँकिंग व्यवहार व्हायरसच्या जाळ्यात

इंटरनेटच्या वापरानंतर भारतातील बँकिंग सेवेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. तथापि, बँकांचे व्यवहार आॅनलाईन झाल्यामुळे सायबर गुन्हेगारी वाढली आहे

By admin | Updated: June 18, 2014 05:38 IST2014-06-18T05:38:50+5:302014-06-18T05:38:50+5:30

इंटरनेटच्या वापरानंतर भारतातील बँकिंग सेवेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. तथापि, बँकांचे व्यवहार आॅनलाईन झाल्यामुळे सायबर गुन्हेगारी वाढली आहे

Online banking transactions are on the net of viruses | आॅनलाईन बँकिंग व्यवहार व्हायरसच्या जाळ्यात

आॅनलाईन बँकिंग व्यवहार व्हायरसच्या जाळ्यात

नवी दिल्ली : इंटरनेटच्या वापरानंतर भारतातील बँकिंग सेवेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. तथापि, बँकांचे व्यवहार आॅनलाईन झाल्यामुळे सायबर गुन्हेगारी वाढली आहे. बँकिंग व्यवहारांना व्हायरसचा फटका बसत आहे. व्हायरसमुळे बँकिंग व्यवहारांवर परिणाम होणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.
सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रेंड मायक्रोने दिलेल्या एका अहवालानुसार, जानेवारी ते मार्च २0१४ या काळात कायदेपालन संस्थांना सावध करण्यात आले होते. मात्र, सायबर गुन्हेगारांनी अटकेपासून वाचण्यासाठी नवनव्या युक्त्या अवलंबिल्या.
भारतात बँकांचे सर्व आर्थिक व्यवहार आता इंटरनेटच्या माध्यमातूनच पूर्ण केले जात आहेत. पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी एटीएम तसेच भरणा यंत्रांचा वापर केला जात आहे. ही यंत्रे आॅनलाईन काम करतात. याशिवाय ग्राहकांचा सर्व लेखाजोखा आॅनलाईनच असतो. पूर्वी सर्व लेखे रजिस्ट्ररवर हाताने लिहून ठेवले जात असत. आता ही पद्धत जवळपास बाद झाली आहे. सायबर सुरक्षा मजबूत नसल्यास ही खाती सहज गुन्हेगारांच्या हाती सापडतात. सायबर गुन्हेगारांनी अनेकविध मार्गांनी आपल्या कारवाया सुरू केल्या आहेत. त्याच बरोबर कायदेपालन यंत्रणेपासून वाचण्यासाठीही हे गुन्हेगार वेगवेगळे मार्ग वापरीत आहेत. त्यामुळे पोलिसांना फारच थोड्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचता येते.
आगामी काळात बँकिंग सुरक्षा या मुद्याला प्राधान्य द्यावे लागणार असल्याचे यावरून दिसून येते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Online banking transactions are on the net of viruses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.