कांदे ...२ ...
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:11+5:302015-08-02T22:55:11+5:30

कांदे ...२ ...
>भाववाढीनंतर आयातीचा निर्णयदेशांतर्गत बाजारात कांद्याची किंमत वाढून ती किलोमागे ४० रुपये झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडू नये म्हणून पाकिस्तान, चीन व इजिप्त या देशांतून दहा हजार टन कांदा आयात करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तातडीने प्रक्रियाही सुरू झाली आहे. कांद्याचा भरपूर साठा असल्यामुळे भाववाढीबाबत चिंता करण्याचे काहीही कारण नाही, असे केंद्र शासनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. महिन्याच्या सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील लासलगाव या देशातील सर्वात मोठ्या बाजारात कांद्याचा भाव ६६ टक्के वाढून १५ रुपये किलोवरून २५ रुपयांवर गेला. ठोक बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने भाववाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.रब्बी हंगामाचा भरपूर साठादेशात रब्बी हंगामाचा २८ लाख टन कांद्याचा साठा असून तो दोन महिने पुरेल एवढा आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून खरीप हंगामातील कांद्याची आवक सुरू असून यावर्षी भाव दुपटीवर गेले आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नाफेड या महिन्यात कांदा आयात करण्यासाठी निविदा काढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.