सबंधित फोटो घेता येईल ....कांदा लवकरच स्वस्त होणार!- १० टन कांद्याची आयात : साठेबाजांवर कारवाई करणारनागपूर : कृत्रिम टंचाई करणाऱ्या साठेबाजांवर कारवाई करण्याचे सूतोवाच करताना केंद्र सरकारने १० ते १२ लाख टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतल्याने पुढील काही दिवसांतच कांदा स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. नवीन कांद्याची आवक वाढलीराज्य आणि शासनाच्या निर्णयानंतर साठेबाजांनी कांदे बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीस आणले आहेत. कळमना बाजारात गेल्या काहीच दिवसांपूर्वी दररोज ७ ते ८ ट्रकची असलेली आवक तीन ते चार दिवसांपासून २० ते २२ ट्रकवर गेल्याने चढ्या भावावर नियंत्रण आले आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील नवीन कांदा सध्या बाजारात येत आहे. कधी नव्हे एवढा जास्त भाव, या कांद्याला मिळत आहे. याशिवाय बेंगळुरु मार्केटमध्ये जुना व नवीन कांद्याचे २५० पेक्षा जास्त ट्रक आणि हैदराबाद मार्केटमध्ये १०० पेक्षा जास्त ट्रकची दररोज आवक आहे. त्यामुळे भाववाढीवर वचक बसला आहे. आवक वाढल्याने अनावश्यक भाववाढ करणारे घाबरले आहेत. महिन्याभरातच कांद्याचे भाव सर्वसामान्यंाना दिलासा देणाऱ्या किमतीवर येतील, असा विश्वास कळमना मार्केट आलू-कांदे असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. ग्राहकांनी आवश्यक तेवढेच कांदे खरेदी करावे, असा सल्ला त्यांनी दिला. व्यापारी व शेतकऱ्यांकडे कांद्याची साठवणूकशासनाच्या निर्णयानंतर आणि नवीन कांदे बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागल्यानंतर साठेबाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी कांदे बाजारात विक्रीस आणण्यास सुरुवात केली. मनमाड, नाशिक, पुणे, अहमदनगर, अकोला, अमरावती, बुलडाणा या भागातून कांदे कळमन्यात विक्रीस येत आहेत. शेतकरी स्वत:हून कांदे विक्रीस आणत आहेत. दसऱ्याला धुळे तर दिवाळीला नाशिक, अहमदनगर व पुणे या जिल्ह्यातील कांदे बाजारात येतील. यावर्षी पाऊस चांगला असल्याने पीकही उत्तम येईल, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. सध्या कळमना ठोक बाजारात लाल आणि पांढरा कांदा ३० ते ३५ रुपये किलोदरम्यान विक्रीस आहेत.
कांदे ...१ ...
संबंधित फोटो घेता येईल ....
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:09+5:302015-08-02T22:55:09+5:30
संबंधित फोटो घेता येईल ....
