नवी दिल्ली : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) पश्चिम किनाऱ्याकडील उत्पादन वाढविण्यासाठी १० हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
महामंडळाच्या संचालक मंडळाने मुंबई हाय दक्षिण तेल आणि गॅस फिल्डच्या तिसऱ्या टप्प्याचा पुनर्विकास व मुक्ता, बासीनवर पन्ना क्षेत्राच्या एकत्रित विकासाला मंजुरी दिली आहे. मुंबई हाय (दक्षिण) ६,०६९ कोटी व मुक्ता व पन्ना क्षेत्राच्या विकासासाठी ४,६२० कोटी रुपये गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. ही माहिती महामंडळाने पत्रकाद्वारे दिली. मुंबई हायच्या (दक्षिण) तिसऱ्या टप्प्याच्या पुनर्विकासातून २०३० पर्यंत ७५.४७ लाख टन कच्चे तेल आणि ३.८६ अब्ज घनमीटर वायू मिळेल. या क्षेत्राचा नव्याने विकास करण्यासाठी या योजनेत ३६ नव्या विहिरी खोदल्या जातील. शिवाय ३४ साईडट्रॅक विहिरीही खोदल्या जातील.
मुंबई किनाऱ्यापासून ८० ते ९० किलोमीटरवरील मुक्ता, बासीन व पन्ना क्षेत्रांना नव्याने विकसित करून त्यांचे आयुष्य वाढविण्यासाठी ही नवी गुंतवणूक होत आहे. गॅस उत्पादन चालू आर्थिक वर्षातच सुरू होण्याची अपेक्षा आहे. वर्ष २०१७-१८ पर्यंत क्षेत्रातून रोज एक कोटी घनमीटर वायू, ९५० बॅरल्स तेल मिळू लागेल. या क्षेत्रातून वायूचे उत्पादन वाढविण्यासाठी १९९९ आणि २००७ मध्ये विकासाचे काम करण्यात आले होते. हे विकास काम झाल्यानंतर २०२७-२८ पर्यंत १९.५६ घनमीटर वायू व १८.३० लाख टन तेलाचे उत्पादन होईल.
ओएनजीसी गुंतवणार १०,६०० कोटी
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) पश्चिम किनाऱ्याकडील उत्पादन वाढविण्यासाठी १० हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
By admin | Updated: November 17, 2014 03:16 IST2014-11-17T03:16:40+5:302014-11-17T03:16:40+5:30
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) पश्चिम किनाऱ्याकडील उत्पादन वाढविण्यासाठी १० हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
