Lokmat Money > बिझनेस न्यूज > दीड लाख बँक कर्मचारी निवृत्तीच्या वाटेवर

दीड लाख बँक कर्मचारी निवृत्तीच्या वाटेवर

देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांमधील दीड लाख कर्मचारी २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत निवृत्त होणार आहेत. निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या

By admin | Updated: January 15, 2015 06:07 IST2015-01-15T06:07:51+5:302015-01-15T06:07:51+5:30

देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांमधील दीड लाख कर्मचारी २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत निवृत्त होणार आहेत. निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या

One and a half lakh employees leave for retirement | दीड लाख बँक कर्मचारी निवृत्तीच्या वाटेवर

दीड लाख बँक कर्मचारी निवृत्तीच्या वाटेवर

राम देशपांडे, अकोला
देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांमधील दीड लाख कर्मचारी २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत निवृत्त होणार आहेत. निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन आणि इतर समायोजित रकमेचा लेखाजोखा तयार करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. ५0 टक्के कर्मचारी निवृत्तीच्या मार्गावर असताना त्या तुलनेत नवीन भरती होत नसल्याचे चित्र दिसत
आहे.
देशाचा आर्थिक कामगिरीमध्ये राष्ट्रीयीकृत बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. गत ३० वर्षांच्या कालखंडात बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. बँकिंग क्षेत्राला सुबत्ता प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने काळानुरूप बदल स्वीकारत, बँकिंग क्षेत्राला अत्याधुनिकतेची जोड देण्याचा प्रत्यक्ष अनुभव निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
८५ च्या दशकापासून सेंट्रल बँक आॅफ इंडिया, कॅनरा बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया या देशातील सहा प्रमुख राष्ट्रीयीकृत बँकांसह बँक आॅफ महाराष्ट्र, इंडियन बँक, अलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, देना बँक, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स अशा देशातील २८ राष्ट्रीयीकृत बँकांमधे विविध पदांवर काम करणारे दीड लाख कर्मचारी अनुभवाची शिदोरी घेऊन वर्ष २0१६ ते २0१८ या तीन वर्षांत निवृत्त होणार आहेत. त्यांचे निवृत्तीवेतन व इतर समायोजित रक्कम अदा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेस प्रारंभ झाला असून, बँकांना नवीन कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेस सुरुवात करावी लागणार आहे.

Web Title: One and a half lakh employees leave for retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.