Lokmat Money > बिझनेस न्यूज > तेलाच्या किमतीत तीन टक्क्यांनी घट

तेलाच्या किमतीत तीन टक्क्यांनी घट

तेल निर्यातदार देशांच्या संघटनेने (ओपेक) आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचा पुरवठा नियंत्रित करण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला

By admin | Updated: July 10, 2017 00:13 IST2017-07-10T00:13:33+5:302017-07-10T00:13:33+5:30

तेल निर्यातदार देशांच्या संघटनेने (ओपेक) आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचा पुरवठा नियंत्रित करण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला

Oil prices fall by 3% | तेलाच्या किमतीत तीन टक्क्यांनी घट

तेलाच्या किमतीत तीन टक्क्यांनी घट

वॉशिंग्टन- अमेरिकेने खनिज तेलाच्या उत्पादनामध्ये वाढ केल्याने तेल निर्यातदार देशांच्या संघटनेने (ओपेक) आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचा पुरवठा नियंत्रित करण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला आहे. या प्रकारामुळे गतसप्ताहामध्ये खनिज तेलाच्या किंमतीत तीन टक्कयांनी घट झाल्यामुळे ओपेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.ओपेक देशांनी जून महिन्यात प्रतिदिन दोन दशलक्ष पिंपे खनिज तेलाची निर्यात केली आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेमध्ये ही निर्यात चांगली झाली आहे. उत्पादनावर कठोर निर्बंध घालूनही खनिज तेलाचे उत्पादन वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पुरवठा वाढून भाव कमी होत आहेत. ओपेक देशांचा सहयोगी सदस्य असलेल्या रशियाने २४ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये करारामध्ये काही बदल करण्याबाबतचे संकेत दिले आहेत. यामुळे आगामी काळात तेलाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Oil prices fall by 3%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.