सिंगापूर : आशियाच्या बाजारात शुक्रवारी तेलाच्या किमती वाढल्या. तेल उत्पादक देशांच्या लवकरच होणाऱ्या बैठकीत उत्पादन कमी करण्यावर चर्चा होईल. त्याचा परिणाम म्हणून ब्रेंटचे कच्चे तेल बॅरलला ४० अमेरिकन डॉलर झाले. गेल्या ११ आठवड्यांत अमेरिकेचे तेल उत्पादन १० व्यांदा खाली येऊन एक एप्रिल रोजीच्या आठवड्यात दररोज ९.० दशलक्ष बॅरलवर आले. नोव्हेंबर २०१४ पासूनचे हे सगळ्यात खाली आलेले उत्पादन आहे, असे अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने
सांगितले.
जगात सर्वात जास्त तेलाचा वापर करणाऱ्या अमेरिकेतील व्यावसायिक वापरासाठीच्या तेलाचा साठाही कमी झाला असल्यामुळे मोठी मागणी वाढल्याचे संकेत आहेत. वेस्ट टेक्सास इंंटरमिजिएटचे मे महिन्याच्या डिलिव्हरीचे तेल बॅरलमागे ७६ सेंट्सने (२.०४ टक्के) वाढून ३८.०२ अमेरिकन डॉलर झाले, तर ब्रेंटचे कच्चे तेल (जूनची डिलिव्हरी) ६२ सेंट्सने (१.५७ टक्के) वाढून ४०.०५ अमेरिकन डॉलरवर गेले.
१७ एप्रिल रोजी दोहामध्ये रशिया आणि सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली कच्च्या तेल उत्पादक देशांची तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी बैठक होणार आहे. जानेवारी २०१६ मध्ये जेवढे उत्पादन होते त्या पातळीवर ते आणण्याचाही बैठकीत विचार होईल. या बैठकीत उत्पादन कपातीचा करार होईलच, असे संकेत फारसे नाहीत. सौदी अरेबियाने इतर देशही उत्पादन घटविणार असतील तरच आम्ही तसे करू असे म्हटले, तर इराणने आमच्यावरील निर्बंध पाश्चिमात्य राष्ट्रांनी गेल्या जानेवारी महिन्यातच हटविल्यामुळे आम्ही उत्पादन वाढवीत आहोत, असे स्पष्ट केले.
दोहा येथील बैठकीत काही ठाम निर्णय होईल असा इतिहास नाही, असे सिडनीत फॅट प्रोफेट्सचे विश्लेषक डेव्हिड लिनोक्स यांनी सांगितले.
आशियाच्या बाजारात तेलाचे भाव वाढले
आशियाच्या बाजारात शुक्रवारी तेलाच्या किमती वाढल्या. तेल उत्पादक देशांच्या लवकरच होणाऱ्या बैठकीत उत्पादन कमी करण्यावर चर्चा होईल
By admin | Updated: April 8, 2016 22:33 IST2016-04-08T22:33:08+5:302016-04-08T22:33:08+5:30
आशियाच्या बाजारात शुक्रवारी तेलाच्या किमती वाढल्या. तेल उत्पादक देशांच्या लवकरच होणाऱ्या बैठकीत उत्पादन कमी करण्यावर चर्चा होईल
