Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकन डॉलर मजबूत होताच तेल स्वस्त झाले

अमेरिकन डॉलर मजबूत होताच तेल स्वस्त झाले

अमेरिकन डॉलर वधारताच डॉलरमध्ये घ्याव्या लागणाऱ्या वस्तूंची मागणी खाली आली व पर्यायाने अमेरिकेचे कच्चे तेल बॅरलमागे ५० अमेरिकन डॉलरच्या खाली आले

By admin | Updated: July 21, 2015 23:01 IST2015-07-21T23:01:49+5:302015-07-21T23:01:49+5:30

अमेरिकन डॉलर वधारताच डॉलरमध्ये घ्याव्या लागणाऱ्या वस्तूंची मागणी खाली आली व पर्यायाने अमेरिकेचे कच्चे तेल बॅरलमागे ५० अमेरिकन डॉलरच्या खाली आले

Oil became cheaper when the US Dollar became stronger | अमेरिकन डॉलर मजबूत होताच तेल स्वस्त झाले

अमेरिकन डॉलर मजबूत होताच तेल स्वस्त झाले

सिंगापूर : अमेरिकन डॉलर वधारताच डॉलरमध्ये घ्याव्या लागणाऱ्या वस्तूंची मागणी खाली आली व पर्यायाने अमेरिकेचे कच्चे तेल बॅरलमागे ५० अमेरिकन डॉलरच्या खाली आले. याचा परिणाम साहजिकच मंगळवारी आशियात तेलाचे भाव खाली येण्यात झाला.
बाजाराच्या विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच अतिरिक्त पुरवठा होत असलेल्या जागतिक बाजारपेठेत येत्या काही महिन्यांत इराणचे कच्चे तेल येऊन दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेही तेलाचे भाव कमी होतील. दुपारच्या सत्रात वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या (डब्ल्यूटीआय) आॅगस्टच्या डिलिव्हरीसाठीचे तेल बॅरलमागे २० सेंटस्ने घसरून ४९.९५ अमेरिकन डॉलरवर, तर बे्रंट कच्चे तेल सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठी १४ सेंटस्ने स्वस्त होऊन ५६.५१ अमेरिकन डॉलरवर आले. सध्या तेलाच्या किमतीत ज्या काही घडामोडी होत आहेत त्या डॉलर मजबूत झाल्याचा परिणाम आहे, असे येथील फिलीप फ्युचर्सचे गुंतवणूक विश्लेषक डॅनियल अँग यांनी सांगितले. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने गती घेतल्यामुळे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने मुख्य व्याजदरात यावर्षीच्या दुसऱ्या अर्ध्या भागात वाढ होईल या भाकीतावर फेडरल बँकेच्या प्रमुख जॅनेट येलेन गेल्या आठवड्यात ठाम राहिल्यामुळे डॉलर मजबूत झाला. व्याजदरात वाढ झाल्यास डॉलरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढीव मोबदल्याच्या आशेने वाढेल. तेलाची किंमत डॉलरमध्ये मोजावी लागते. तोच मजबूत झाल्यामुळे तेल महागले व त्यामुळे त्याची मागणी खाली येताच त्याचे भावही घसरले. ग्रीसमधील घडामोडींबद्दलची काळजी आणि चीनने स्वस्तात तेलाचा साठा विकण्याच्या पार्श्वभूमीवरही फेडरल बँकेने यावर्षी मुख्य व्याजदरात वाढ करण्याचा पुनरुच्चार केला, असे सिंगापूरच्या डीबीएस बँकेने बाजारावर केलेल्या टिपणीत म्हटले.
ग्रीसने आपल्या कर्जदारांच्या अटी मान्य केल्या. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठीची ही त्याची तिसरी योजना आहे. त्यामुळे इतर देश व्याजदर कमी ठेवू शकतील.

Web Title: Oil became cheaper when the US Dollar became stronger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.