नवी दिल्ली : उत्पादन शुल्क लावल्याच्या निषेधार्थ ज्वेलर्स व्यापारी संपावर गेले असून, या संपाचा आता चौथा आठवडा सुरू होत आहे. दरम्यान, ज्वेलर्स व्यापाऱ्यांना कर अधिकारी त्रस्त करणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असा शब्द अर्थमंत्री जेटली यांनी दिला आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हे स्पष्ट केले की, चैनीच्या किमती उत्पादनांना करातून सूट देता येणार नाही. पत्रकारांशी बोलताना जेटली म्हणाले की, सोने आणि अन्य आभूषणे हे जीएसटी प्रणालीचा एक भाग आहेत. सोन्याच्या दागिन्यांवरील एक टक्का उत्पादन शुल्क यातच समाविष्ट होईल. कोणत्याही लक्झरी वस्तूंना कर द्यावा लागेल. अर्थसंकल्पात दागिन्यांवर एक टक्का उत्पादन शुल्काचा प्रस्ताव आहे.
तोडगा काढण्यासाठी समितीची स्थापना
सरकारने या व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी माजी मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिडी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. हे शुल्क प्राथमिक निर्मिती करणाऱ्यालाच लागणार आहे. कारागीर अथवा छोट्या व्यावसायिकांना लागणार नाही, असेही ते म्हणाले.
संप सुरूच राहणार : उत्पादन शुल्काचा निर्णय मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील, असा इशारा सराफा व्यापाऱ्यांनी दिला आहे. व्यापाऱ्यांची प्रमुख संघटना कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स, आॅल इंडिया ज्वेलर्स अॅण्ड सुवर्णकार फेडरेशन यांनी आज स्पष्ट केले आहे की, उत्पादन शुल्काबाबत प्रस्ताव मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत संप सुरू राहील. या प्रकरणी पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही संघटनांनी केली आहे.
सराफ ांना अधिकारी त्रस्त करणार नाहीत - जेटली
उत्पादन शुल्क लावल्याच्या निषेधार्थ ज्वेलर्स व्यापारी संपावर गेले असून, या संपाचा आता चौथा आठवडा सुरू होत आहे. दरम्यान, ज्वेलर्स व्यापाऱ्यांना कर अधिकारी त्रस्त करणार नाहीत
By admin | Updated: March 28, 2016 01:47 IST2016-03-28T01:47:44+5:302016-03-28T01:47:44+5:30
उत्पादन शुल्क लावल्याच्या निषेधार्थ ज्वेलर्स व्यापारी संपावर गेले असून, या संपाचा आता चौथा आठवडा सुरू होत आहे. दरम्यान, ज्वेलर्स व्यापाऱ्यांना कर अधिकारी त्रस्त करणार नाहीत
