Lokmat Money > बिझनेस न्यूज > अधिकारी सुटीवर, ठेकेदार कामावर

अधिकारी सुटीवर, ठेकेदार कामावर

टोकावडे - डांबरी रस्त्यांची कामे १५ मेनंतर करू नयेत, असे शासनाचे आदेश असताना याला अपवाद मात्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२२२ ठरला असून पावसाळा तोंडावर आला असतानादेखील या विभागाची डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे करताना अधिकारी सुटीवर तर ठेकेदार कामावर, असा प्रकार सुरू असूनही कामे करताना कमी डांबर टाकल्याचे दिसून येत आहे.

By admin | Updated: June 12, 2014 00:23 IST2014-06-12T00:23:30+5:302014-06-12T00:23:30+5:30

टोकावडे - डांबरी रस्त्यांची कामे १५ मेनंतर करू नयेत, असे शासनाचे आदेश असताना याला अपवाद मात्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२२२ ठरला असून पावसाळा तोंडावर आला असतानादेखील या विभागाची डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे करताना अधिकारी सुटीवर तर ठेकेदार कामावर, असा प्रकार सुरू असूनही कामे करताना कमी डांबर टाकल्याचे दिसून येत आहे.

Officers on vacation, work contractor | अधिकारी सुटीवर, ठेकेदार कामावर

अधिकारी सुटीवर, ठेकेदार कामावर

कावडे - डांबरी रस्त्यांची कामे १५ मेनंतर करू नयेत, असे शासनाचे आदेश असताना याला अपवाद मात्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२२२ ठरला असून पावसाळा तोंडावर आला असतानादेखील या विभागाची डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे करताना अधिकारी सुटीवर तर ठेकेदार कामावर, असा प्रकार सुरू असूनही कामे करताना कमी डांबर टाकल्याचे दिसून येत आहे.
१५ मेनंतर डांबरीकरणाची कामे करण्यात येऊ नयेत, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग क्र.-२२२ वर खाटेघर ते मोहप या ४ किमी रस्त्याचे काम सुरू असून कमी डांबर वापरून कारपेटचे काम करण्यात येत आहे. हे काम करताना या विभागाचा एखादा कर्मचारी देखरेखीसाठी असायला हवा. परंतु, एकही कर्मचारी नसताना हे काम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे काम शनिवार व रविवार करण्यात येत आहे. या दिवशी अधिकारी सुटीवर असतात. ही संधी साधून ठेकेदार काम उरकून घेतात. मात्र, याबाबत कार्यकारी अभियंता ना.मु. पवार यांनी सांगितले की, सध्या डांबराचा तुटवडा असल्याने ते जेव्हा मिळेल तेव्हा हे काम करण्यात येते. ठेकेदाराकडे ५० ते १०० कर्मचारी असतात. त्यांना काम बंद असले तरी त्या ठेकेदाराला पगार द्यावा लागतो. आमच्याकडे कर्मचारी कमी असून त्यांनाही घरदार आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशी आम्ही कसे कामावर येणार. विशेष म्हणजे मुरबाड ते माळशेज घाट या ७० किमी अंतरावर देखरेखीसाठी एकच शाखा अभियंता आहे. त्यामुळे असे प्रश्न उद्भवतात.

(वार्ताहर)

श्याम राऊत

Web Title: Officers on vacation, work contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.