Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ओडिशा बनले फसव्या कंपन्यांचे माहेरघर

ओडिशा बनले फसव्या कंपन्यांचे माहेरघर

भरमसाट व्याज वा परताव्याचे आमिष दाखवून बेकायदा पैसे गुंतवणूक योजनांचा पश्चिम बंगालनंतर ओडिशातही सुळसुळाट झाला आहे.

By admin | Updated: November 5, 2014 03:47 IST2014-11-05T03:47:36+5:302014-11-05T03:47:36+5:30

भरमसाट व्याज वा परताव्याचे आमिष दाखवून बेकायदा पैसे गुंतवणूक योजनांचा पश्चिम बंगालनंतर ओडिशातही सुळसुळाट झाला आहे.

The Odyssey became the home of fraudulent companies | ओडिशा बनले फसव्या कंपन्यांचे माहेरघर

ओडिशा बनले फसव्या कंपन्यांचे माहेरघर

नवी दिल्ली : भरमसाट व्याज वा परताव्याचे आमिष दाखवून बेकायदा पैसे गुंतवणूक योजनांचा पश्चिम बंगालनंतर ओडिशातही सुळसुळाट झाला आहे. ओडिशात सोन्यात व जट्रोफा रोपांच्या गुंतवणुकीत भरमसाट परताव्याची लालूच दाखवून लोकांना लुबाडण्यात आले आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) अशा लबाड कंपन्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू केल्यानंतर ही बाब उघड झाली.
सेबीने सुरू केलेल्या चौकशीत अशा अनेक कंपन्यांची मुख्यालये किंवा लक्षात येईल एवढा वावर ओडिशात आढळला आहे. बेकायदा सामूहिक गुंतवणूक योजना राबविल्याबद्दल या कंपन्यांची चौकशी सुरू आहे. शिवाय सेबीने अन्य २० कंपन्यांवर याआधीच दंडाची कारवाई सुरू केली आहे. सेबीकडून होत असलेल्या चौकशीत सनशाईन आणि ग्रीन रे समूहाचे नाव प्रामुख्याने आले आहे. या दोन कंपन्यांनी काही वर्षांपूर्वी काही वर्षांत गुंतवणूक दुप्पट करण्याचे व भला भक्कम नफा देण्याचे आश्वासन दिले होते. स्थावर मालमत्ता, जट्रोफा रोपांची लागवड, हॉटेल, सोने-चांदी, शेतीसंबंधी उपक्रम आदींच्या माध्यमातून या कंपन्यांनी हजार कोटी रुपयांची लोकांकडून गुंतवणूक करून घेतली आहे.
पश्चिम बंगालमधून कारभार करणाऱ्या शारदा समूहासह अनेक कंपन्यांचे कामकाजही ओडिशातून चालतो. शारदा समूहासह इतर अनेक प्रकरणांत सेबीने निर्देश दिले आहेत. शिवाय अन्य चौकशी यंत्रणांकडूनही चौकशी सुरू आहेत. यापूर्वी ओडिशातून मुख्यत: कृषीशी संबंधित उपक्रमांतून गुंतवणूक केली जायची. जट्रोफा रोपांच्या लागवडीत गुंतवणूक केल्यास अवघ्या ७ वर्षांत तीनपट परतावा देण्याचे आश्वासन लोकांना दिले गेले होते.
जट्रोफा हे जंगली रोप असून ते इजिप्त, भारत आणि मेदागास्करच्या दुष्काळी आणि उष्ण भागात आढळते. गोल्डमॅन सॅक्स या जागतिक बँकिंग व गुंतवणूक कंपनीने भविष्यात जट्रोफा जैव डिझेल उत्पादनाचे प्रमुख स्रोत असेल अशी भविष्यवाणी करताच २००७ मध्ये या रोपाचे प्रचंड महत्त्व वाढले. जगात अनेक देशांनी जट्रोफाच्या लागवडीला जैव इंधनात त्याचे मिश्रण अनिवार्य करण्यासाठी खास कार्यक्रम सादर केले तरी एकूण प्रतिसाद उत्साहवर्धक नव्हता. जैव इंधनाशी जट्रोफाचा संबंध जोडला गेल्यामुळे काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून पैसा गुंतवून घेतला.

Web Title: The Odyssey became the home of fraudulent companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.