Lokmat Money > बिझनेस न्यूज > नळदुर्गचा किल्ला होणार टुरिझम स्पॉट दहा वर्षांचा करार; सोलापूरची मल्टिकॉन कंपनी करणार विकास

नळदुर्गचा किल्ला होणार टुरिझम स्पॉट दहा वर्षांचा करार; सोलापूरची मल्टिकॉन कंपनी करणार विकास

सोलापूर: उस्मानाबाद जिल्?ातील नळदुर्ग किल्ला टुरिझम स्पॉट म्हणून आता नावारूपाला येणार आहे. सोलापुरातील मल्टिकॉन या कंपनीने हा किल्ला दहा वर्षांसाठी ताब्यात घेतला असून याबाबत तसा करारही झाला आहे.

By admin | Updated: September 11, 2014 22:54 IST2014-09-11T22:54:12+5:302014-09-11T22:54:12+5:30

सोलापूर: उस्मानाबाद जिल्?ातील नळदुर्ग किल्ला टुरिझम स्पॉट म्हणून आता नावारूपाला येणार आहे. सोलापुरातील मल्टिकॉन या कंपनीने हा किल्ला दहा वर्षांसाठी ताब्यात घेतला असून याबाबत तसा करारही झाला आहे.

Nuradurg fort will be a 10 year contract for tourism; Solapur's multicon company will develop | नळदुर्गचा किल्ला होणार टुरिझम स्पॉट दहा वर्षांचा करार; सोलापूरची मल्टिकॉन कंपनी करणार विकास

नळदुर्गचा किल्ला होणार टुरिझम स्पॉट दहा वर्षांचा करार; सोलापूरची मल्टिकॉन कंपनी करणार विकास

लापूर: उस्मानाबाद जिल्?ातील नळदुर्ग किल्ला टुरिझम स्पॉट म्हणून आता नावारूपाला येणार आहे. सोलापुरातील मल्टिकॉन या कंपनीने हा किल्ला दहा वर्षांसाठी ताब्यात घेतला असून याबाबत तसा करारही झाला आहे.
महाराष्ट्र शासन, पुरातत्त्व विभाग आणि युनिटी यांच्यात याबाबतचा करार झाला असून पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे पर्यटन वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेंतर्गत हा किल्ला विकसित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे, उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकर चव्हाण, पुरातत्त्व विभाग महाराष्ट्राचे संचालक संजय पाटील, युनिटी कंपनीचे प्रमुख कफील मौलवी, भरत जैन, जयधवल शहा, अनिल पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे करारावर स्वाक्षर्‍या झाल्या. नळदुर्गचा किल्ला प्राचीन असून या किल्ल्यामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. नर-मादी धबधबा हा पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरतो. बीओटीच्या माध्यमातून किल्ल्यामध्ये अत्याधुनिक उद्यान, बालगोपाळांसाठी खेळणी, रोज गार्डन तसेच लेझर शोच्या माध्यमातून किल्ल्याचा इतिहास मांडण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
इन्फो बॉक्स::::::::::
दहा वर्षांनंतर निर्णय
पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळत पडलेला हा प्रश्न मार्गी लावला आहे. शासनदरबारी पाठपुरावा करून किल्ल्याचा विकास होण्यासाठी युनिटी कंपनीच्या ताब्यात हा किल्ला दिला आहे. यामुळे पर्यटकांना आता चांगल्या सुविधा मिळणार आहेत. याशिवाय बेरोजगार युवकांनाही काम मिळणार असल्याचे कफील मौलवी यांनी सांगितले.
फोटो ओळी:::::::::::::
नळदुर्ग किल्ला ताब्यात देण्याच्या कराराप्रसंगी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे, उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, कफील मौलवी, भरत जैन, जयधवल शहा, अनिल पाटील व मान्यवर.

Web Title: Nuradurg fort will be a 10 year contract for tourism; Solapur's multicon company will develop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.