Lokmat Money > बिझनेस न्यूज > बंद पडलेल्या कंपन्यांची संख्या ६१, ५०० वर

बंद पडलेल्या कंपन्यांची संख्या ६१, ५०० वर

जागतिक मंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला फटका आणि निर्यातीमुळे जागतिक अर्थकारणातील बिघडलेली स्थिती यामुळे देशातील बंद

By admin | Updated: July 21, 2015 23:20 IST2015-07-21T23:20:40+5:302015-07-21T23:20:40+5:30

जागतिक मंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला फटका आणि निर्यातीमुळे जागतिक अर्थकारणातील बिघडलेली स्थिती यामुळे देशातील बंद

Number of companies closed at 61, 500 | बंद पडलेल्या कंपन्यांची संख्या ६१, ५०० वर

बंद पडलेल्या कंपन्यांची संख्या ६१, ५०० वर

नवी दिल्ली : जागतिक मंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला फटका आणि निर्यातीमुळे जागतिक अर्थकारणातील बिघडलेली स्थिती यामुळे देशातील बंद पडलेल्या लहानमोठ्या कंपन्यांची संख्या ६१ हजार ५०० वर पोहोचली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, गेल्या साडे तीन महिन्याच्या कालावधीत यामध्ये ३५ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिलेल्या एका लेखी प्रश्नाच्या उत्तराद्वारे उजेडात आली आहे.
मार्च २०१५ रोजी देशातील बंद पडलेल्या उद्योगांची संख्या ही ४५ हजार ६०३ इतकी होती. कर्जाचे वाढते प्रमाण, कर्ज संपवून उद्योगच बंद करणे, मंदीचा फटका अशा विविध कारणांमुळे या कंपन्या बंद झाल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Number of companies closed at 61, 500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.