नवी दिल्ली : देशाची सगळ्यात मोठी वीज निर्माण करणारी कंपनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) येत्या दहा वर्षांत सध्याची तिची क्षमता दुप्पट करून ९० हजार मेगावॅट करणार आहे. एनटीपीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण रायचौधरी यांनी ही माहिती दिली.
सध्या कंपनी तिची सगळी साधने वापरून ४४,३९८ मेगावॅट वीज निर्माण करीत आहे. यात २७ टक्के उत्पादन (१२,२१५ मेगावॅट) गेल्या साडेचार वर्षांत वाढले आहे. रायचौधरी म्हणाले की, ‘‘येत्या पाच वर्षांत आमची क्षमता २३ हजार मेगावॅट होईल. १५ हजार मेगावॅटसाठी कंत्राट देण्याचे काम येत्या सात वर्षांत पूर्ण होईल. आणखी ८ हजार मेगावॅटचे नियोजन होत असून ते प्रत्यक्षात यायला दहा वर्षे लागतील. एनटीपीसी कोळशापासून जास्त वीज निर्माण करते. आपल्या एकूण वीजनिर्मिती क्षमतेमध्ये ती सौर ऊर्जेलाही समाविष्ट करून घेणार आहे. सौर ऊर्जा परियोजना कार्यान्वित करण्यात अनेक आव्हाने असली तरी आम्हाला यात काम होईल अशी आशा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एनटीपीसी वीजनिर्मिती दहा वर्षांत दुप्पट करणार
देशाची सगळ्यात मोठी वीज निर्माण करणारी कंपनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) येत्या दहा वर्षांत सध्याची तिची क्षमता दुप्पट करून
By admin | Updated: April 3, 2015 23:49 IST2015-04-03T23:49:56+5:302015-04-03T23:49:56+5:30
देशाची सगळ्यात मोठी वीज निर्माण करणारी कंपनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) येत्या दहा वर्षांत सध्याची तिची क्षमता दुप्पट करून
