अमरावती : शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आदी कार्यालयांकडून नागरिकांना परवाने, दाखला व शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यासाठी विविध नमुन्यातील शपथपत्रे आणि साक्षांकित प्रती सादर कराव्या लागतात. यामध्ये नागरिकांची गैरसोय होते. आता मात्र याऐवजी शक्य तेथे स्वघोषणा प्रमाणपत्र तसेच स्वयंसाक्षांकित प्रती स्वीकारण्यात येणार आहेत. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी याविषयीचे आदेश जारी केलेत.
यापूर्वी शासकीय कामकाजाचे शपथपत्र सादर करताना मूळ प्रमाणपत्रांच्या राजपत्रित अधिकारी, विशेष कार्यकारी अधिकारी व इतर सक्षम अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेल्या प्रती सादर कराव्या लागत असत. यामध्ये नागरिकांची गैरसोय होत असे. ही प्रचलित कार्यपद्धती सुलभ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आदी ठिकाणी शपथपत्राऐवजी (एफिडेव्हिट) स्वघोषणापत्र (सेल्फ डिक्लेरेशन), तसेच कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती (अटेस्टेड कॉपीज) स्वीकृत करण्याचे आदेश शासनाने बजावले आहेत.
ज्या ठिकाणी विद्यमान कायदा, नियमांद्वारे अर्जासह शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे, तेथे शपथपत्रांचाच वापर करावा लागणार आहे. मात्र जेथे बंधनकारक नाही, तेथे शपथपत्रांची मागणी न करता त्याऐवजी स्वघोषणापत्रे स्वीकारली जातील.
आता शपथपत्रासाठी मुद्रांकांची गरज नाही
शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आदी कार्यालयांकडून नागरिकांना परवाने, दाखला व शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून
By admin | Updated: March 12, 2015 00:12 IST2015-03-12T00:12:50+5:302015-03-12T00:12:50+5:30
शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आदी कार्यालयांकडून नागरिकांना परवाने, दाखला व शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून
