Lokmat Money > बिझनेस न्यूज > भिकाऱ्यांसाठी आणणार आता केंद्रीय योजना

भिकाऱ्यांसाठी आणणार आता केंद्रीय योजना

बेघर, निराधार आणि विस्थापित बनलेले लोक भीक मागण्याचा मार्ग निवडतात. या समस्येवर मात करण्यासाठी त्यांना निवारा, आरोग्य सुविधा पुरविण्यासह कौशल्य

By admin | Updated: January 18, 2016 00:22 IST2016-01-18T00:22:13+5:302016-01-18T00:22:13+5:30

बेघर, निराधार आणि विस्थापित बनलेले लोक भीक मागण्याचा मार्ग निवडतात. या समस्येवर मात करण्यासाठी त्यांना निवारा, आरोग्य सुविधा पुरविण्यासह कौशल्य

Now plans for the beggars | भिकाऱ्यांसाठी आणणार आता केंद्रीय योजना

भिकाऱ्यांसाठी आणणार आता केंद्रीय योजना

नवी दिल्ली : बेघर, निराधार आणि विस्थापित बनलेले लोक भीक मागण्याचा मार्ग निवडतात. या समस्येवर मात करण्यासाठी त्यांना निवारा, आरोग्य सुविधा पुरविण्यासह कौशल्य विकास प्रशिक्षणात सहभागी करवून घेण्याबाबत केंद्र सरकार लवकरच योजना आणणार आहे.
समाज कल्याण आणि सशक्तीकरण मंत्रालयाने तयार केलेल्या योजनेंतर्गत अन्न, निवारा, आरोग्य निगा, समुपदेशन तसेच विस्थापितांचे पुनर्वसन यासारख्या सर्वंकष सुविधा पुरविल्या जातील. शारिरीकदृष्ट्या सक्षम असलेल्या गरिबांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासह समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करवून घेताना त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे याकडे लक्ष पुरविले जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले. बेघर लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सामुदायिक पुढाकाराला महत्त्व दिले जाणार असून नव्या प्रयोगांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाईल. गरिबांना अधिकाधिक संवदेनशील आणि जागरूक बनविण्यावर भर असेल.
बेघर आणि विस्थापित झालेल्या लोकांनी भीक मागण्याकडे वळण्याचा प्रश्न चिंतेचे मुख्य कारण बनू लागला आहे. भिकाऱ्यांची विशेषत: मुले आणि महिलांची वाढती संख्या पाहता तातडीने लक्ष देण्याची आणि हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Now plans for the beggars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.