Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘पीएफ’साठी आता एकच क्रमांक

‘पीएफ’साठी आता एकच क्रमांक

केंद्र शासनाने प्रत्येक कामगाराच्या भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडन्ट फंड (पीएफ)साठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) सुरू केला आहे

By admin | Updated: May 16, 2015 00:10 IST2015-05-16T00:10:59+5:302015-05-16T00:10:59+5:30

केंद्र शासनाने प्रत्येक कामगाराच्या भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडन्ट फंड (पीएफ)साठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) सुरू केला आहे

Now the number one for PF | ‘पीएफ’साठी आता एकच क्रमांक

‘पीएफ’साठी आता एकच क्रमांक

मुंबई : केंद्र शासनाने प्रत्येक कामगाराच्या भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडन्ट फंड (पीएफ)साठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) सुरू केला आहे. या क्रमांकामुळे कामगारांनी कंपनी बदलली तरी त्यांचा पीएफ एकाच क्रमांकावर जमा होणार आहे. याबाबत अधिक जनजागृती करण्यासाठी शासनाने देशभर ‘पीएफ आपके द्वार’ या अभियानाची सुरूवात सुरूवात केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. एल. गोयल यांनी सांगितले की, शासनाच्या अभियानाच्या माध्यमातून यूएएन क्रमांक कसा सुरू करायचा? त्याचे फायदे काय? याबाबत जनजानगृती सुरू आहे. कामगार आणि आस्थापनांत जनजागृती करण्यासाठी कामगार संघटना आणि आस्थापना व्यवस्थापन प्रतिनिधींना एकत्रित घेऊन माहिती देण्याचा प्रयत्न शासन करत आहे.
१५ ते २५ मे दरम्यान पार पडणाऱ्या या अभियानात विविध १० चमू तयार करण्यात आले आहेत. या चमूमध्ये विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कामगार आणि आस्थापना प्रतिनिधींना मार्गदर्शन करतील. त्यात यूएएन क्रमांक कसा सुरू करायचा याचे प्रात्यक्षिकही दाखवतील. जेणेकरून संबंधित प्रतिनिधी त्यांच्या कामगारांना मार्गदर्शन करू शकतील. शिवाय शासनातर्फे या अभियानात क्रमांक सुरू केल्याने कोणते फायदे होतील, याबाबतही मार्गदर्शन करणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now the number one for PF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.