लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : करदात्यांच्या सोयीसाठी प्राप्तिकर विभागाने ‘आयकर सेतू’ नावाचे अॅप सादर केले असून, वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते या अॅपचे लोकार्पण करण्यात आले. यावर करविषयक समस्या सोडवण्यात येतील.सध्या अॅण्ड्रॉईड प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे; मात्र डेस्कटॉप सेवेतही ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.सध्या कर भरण्याचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे हे अॅप फार योग्य वेळी आले आहे. या अॅपवर कर भरणे, कर परतावा मागणे, तक्रार नोंदविणे आणि पॅनसाठी अर्ज करणे अशी कामे करता येऊ शकतात. याशिवाय या अॅपवर ‘चॅटबॉट’च्या स्वरूपात लाइव्ह चॅट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी १0 ते सायंकाळी ६ या वेळेत ही सेवा उपलब्ध असेल. करदात्यांच्या पॅन,
टॅन, टीडीएस, रीटर्न फायलिंग, रिफंड स्टेटस आणि कर भरणा यासारख्या विषयाशी संबंधित प्रश्नांना उत्तरे दिली जातील. याशिवाय लोक कर तज्ज्ञांशी लाइव्ह चॅटही करू शकतील.
>हे अॅप उपलब्ध करून देऊन बोर्डाने फारच महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तंत्रज्ञानाचा वापर जास्तीतजास्त प्रमाणात व्हायला हवा. या अॅपचा वापर करून करदाते कुठल्याही बाह्य मदतीशिवाय आपले बहुतांश करविषयक काम घरबसल्या पूर्ण करू शकतील.
- अरुण जेटली, वित्तमंत्री
>हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याशिवाय ७३0६५२५२५२ या क्रमांकावर मिस कॉल देऊनही ते डाऊनलोड करता येऊ शकेल.
करदात्यांसाठी आता ‘आयकर सेतू’ अॅप
करदात्यांच्या सोयीसाठी प्राप्तिकर विभागाने ‘आयकर सेतू’ नावाचे अॅप सादर केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2017 00:08 IST2017-07-12T00:08:17+5:302017-07-12T00:08:17+5:30
करदात्यांच्या सोयीसाठी प्राप्तिकर विभागाने ‘आयकर सेतू’ नावाचे अॅप सादर केले
