Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता हार्वेस्टरने काढता येईल सोयाबीन!

आता हार्वेस्टरने काढता येईल सोयाबीन!

मजुरांची भासणारी कमतरता आणि शेतकऱ्यांची होणारी फरपट बघता, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (व्हीएनएमकेव्ही) हार्वेस्टरने काढता येईल असे नवे सोयाबीन बियाणे विकसित केले आहे.

By admin | Updated: May 18, 2015 23:45 IST2015-05-18T23:45:53+5:302015-05-18T23:45:53+5:30

मजुरांची भासणारी कमतरता आणि शेतकऱ्यांची होणारी फरपट बघता, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (व्हीएनएमकेव्ही) हार्वेस्टरने काढता येईल असे नवे सोयाबीन बियाणे विकसित केले आहे.

Now the harvesters can be soybean removed! | आता हार्वेस्टरने काढता येईल सोयाबीन!

आता हार्वेस्टरने काढता येईल सोयाबीन!

राजरत्न सिरसाट - अकोला
मजुरांची भासणारी कमतरता आणि शेतकऱ्यांची होणारी फरपट बघता, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (व्हीएनएमकेव्ही) हार्वेस्टरने काढता येईल असे नवे सोयाबीन बियाणे विकसित केले आहे. ६५ ते ७० सें. मी. उंच वाढणाऱ्या या झाडाला मुळापासून ७ सें.मी.वर शेंगा लागत असल्याने सोयाबीन पीक हार्वेस्टरने काढणे सोपे झाले आहे.
मराठवाडा व विदर्भात अलीकडे सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, कापूस व इतर खरीप पिकांची जागा सोयाबीनने घेतली आहे. मराठवाड्यात हे क्षेत्र १४ लाख हेक्टर तर विदर्भात १८ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. कमी खर्चात भरपूर उत्पादन देणारे हे पीक आहे.
सध्याच्या सोयाबीन झाडाची वाढ ही ४० सें.मी.पर्यंत असून, या झाडाला मुळापासून ३ सें.मी.पर्यंतच शेंगा लागत असल्याने हार्वेस्टर काढणी करणे अशक्य आहे, तर दुसरीकडे सोयाबीन काढणीसाठी लागणारा खर्च आणि मजुरांचा अभाव यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. यावर उपाय म्हणून विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांनी हे नवे बियाणे (एमएयूएस -१६२) शोधले आहे.
सुधारित बियाणे शेतकऱ्यांना वरदानच ठरणार आहे.

४१०० ते १०५ दिवसांत येणारे हे सोयाबीन असून, हेक्टरी उत्पादन ३१ क्ंिंवटलच्या वर आहे. या बियाणाच्या शेंगा फुटत नसल्याने नुकसान होत नाही. मागील वर्षी या वाणाची शिफारस मराठवाडा विभागासाठी करण्यात आली असली तरी हे सोयाबीन बियाणे राज्यात इतर ठिकाणी घेता येईल.
- डॉ. के. एस. बेग,
कृषी शास्त्रज्ञ (नांदेड), व्हीएनएमकेव्ही

४हार्वेस्टरने काढता यावे असे सोयाबीन बियाणे विकसित केले असून, या सोयाबीनचे उत्पादनही भरघोस आहे. या बियाणामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीसाठी होणारा त्रास कमी झाला आहे.
- डॉ. बी. वेंकटस्वरलू,
कुलगुरू, व्हीएनएमकेव्ही, परभणी

Web Title: Now the harvesters can be soybean removed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.