नवी दिल्ली : भारतीय रोखे बाजार नियंत्रण संस्था सेबीला अधिक अधिकार देणाऱ्या कायद्याची सरकारने अधिसूचना काढली आहे. बेकायदेशीररीत्या धन जमा करणे आणि अन्य प्रकारे फसवणुकीच्या प्रकरणात कारवाईसाठी सेबीला या कायद्यानुसार अधिक अधिकार देण्यात आले आहेत.
नव्या कायद्यांतर्गत सेबीला संपत्ती जप्ती, दंड न भरल्यास अटक करणे आणि संबंधित व्यक्तीचे सर्व फोन कॉल्स रेकॉर्ड मिळविण्याचा अधिकार मिळाला आहे. नुकत्याच संपलेल्या संसद अधिवेशनात रोखे बाजाराशी संबंधित सर्व कायद्यांत दुरुत्या करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत विशेष सेबी न्यायालय स्थापन करण्यासही साहाय्य होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सेबीला अधिकार देणा-या कायद्याची अधिसूचना जारी
भारतीय रोखे बाजार नियंत्रण संस्था सेबीला अधिक अधिकार देणाऱ्या कायद्याची सरकारने अधिसूचना काढली आहे.
By admin | Updated: September 1, 2014 00:23 IST2014-09-01T00:23:12+5:302014-09-01T00:23:12+5:30
भारतीय रोखे बाजार नियंत्रण संस्था सेबीला अधिक अधिकार देणाऱ्या कायद्याची सरकारने अधिसूचना काढली आहे.
