नवी दिल्ली : आयकर विभागाने केयर्न इंडिया कंपनीला २०,४९५ कोटी रुपयांची मागणी करणारी नोटीस दिली आहे. कंपनीची माजी प्रवर्तक केयर्न एनर्जी पीएलसीने भांडवली लाभावर विथहोल्डिंग टॅक्स कापून न घेतल्यामुळे ही नोटीस देण्यात आली आहे. केयर्न कंपनीने आम्हाला ही नोटीस मान्य नसून आम्ही आमच्या हितासाठी सर्व ते प्रयत्न करू, असे म्हटले.
२००६ मध्ये केयर्न एनर्जी पीएलसीने भारतातील आपली सगळी संपत्ती केयर्न इंडियाला हस्तांतरित केली व केयर्न इंडियाची शेअर बाजारात नोंदणी केले. या नोंदणीमुळे कथित २४,५०० कोटी रुपयांचा लाभ झाला व त्यापोटी १०,२४७ कोटी रुपयांच्या कराची मागणी आयकर खात्याने या आठवड्याच्या सुरुवातीला केली होती.
केयर्न इंडिया लिमिटेडने सांगितले की, हे प्रकरण २००६-०७ चे असून केयर्न इंडियाने आयपीओसाठी (इनिशियल पब्लिक आॅफर) अंतर्गत समूह फेररचनेतून केयर्न इंडिया लिमिटेडला केयर्न इंडिया होल्डिंग्ज लिमिटेडचे शेअर हस्तांतरित करण्यात आले होते.
मिळालेल्या नोटीसमध्ये २०,४९५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून ज्यात १०,२४८ कोटी रुपयांचा कर व १०,२४७ कोटींचे व्याज समाविष्ट आहे. आम्ही नेहमीच भारतीय आयकर कायद्याचे पूर्णपणे पालन केले आहे.
केयर्न इंडियाला आयकरची २४,४९५ कोटींची नोटीस
आयकर विभागाने केयर्न इंडिया कंपनीला २०,४९५ कोटी रुपयांची मागणी करणारी नोटीस दिली आहे. कंपनीची माजी प्रवर्तक केयर्न एनर्जी पीएलसीने
By admin | Updated: March 13, 2015 23:56 IST2015-03-13T23:56:30+5:302015-03-13T23:56:30+5:30
आयकर विभागाने केयर्न इंडिया कंपनीला २०,४९५ कोटी रुपयांची मागणी करणारी नोटीस दिली आहे. कंपनीची माजी प्रवर्तक केयर्न एनर्जी पीएलसीने
