नवी दिल्ली : नोएडास्थित फिल्म प्रशिक्षण संस्थांना ५.५ कोटी रुपयांचा सेवा कर थकविल्याप्रकरणी केंद्रीय वित्त मंत्रालयाने नोटिसा बजावल्या आहेत.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क गुप्तचर महासंचालक कार्यालयाने नोएडा येथील एशियन अकॅडमी आॅफ फिल्म अँड टीव्ही, एशियन स्कूल आॅफ मीडिया स्टडीज, एशियन बिझनेस स्कूल, एशियन स्कूल आॅफ कम्युनिकेशन या संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या सर्व संस्था मारवाह स्टुडिओज अंतर्गत चालविण्यात येतात.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, या सर्व संस्था आपल्या अभ्यासक्रमांवर देय असलेला सेवा कर भरत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
फिल्म प्रशिक्षण संस्थांना नोटीस
नोएडास्थित फिल्म प्रशिक्षण संस्थांना ५.५ कोटी रुपयांचा सेवा कर थकविल्याप्रकरणी केंद्रीय वित्त मंत्रालयाने नोटिसा बजावल्या आहेत.
By admin | Updated: November 24, 2014 01:48 IST2014-11-24T01:48:11+5:302014-11-24T01:48:11+5:30
नोएडास्थित फिल्म प्रशिक्षण संस्थांना ५.५ कोटी रुपयांचा सेवा कर थकविल्याप्रकरणी केंद्रीय वित्त मंत्रालयाने नोटिसा बजावल्या आहेत.
