मुंबई : केंद्रीय उत्पादन शुल्क महासंचालनालय अर्थात डीजीसीईआयने देशातील सर्वांत मोठी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला ४.६ कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. मालवाहतूक संस्था म्हणून करभरणा न केल्याने ही कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे.
डीजीसीईआयच्या एका सूत्राने सांगितले की, आम्ही ४.६४ कोटी रुपयांच्या कर देयकापोटी गेल्या महिन्यात इंडियन ऑईल कंपनीला नोटीस दिली होती. कंपनीला येत्या २४ मेपर्यंत या कारणे दाखवा नोटिसीचे उत्तर द्यायचे आहे.
डीजीसीईआयचे अतिरिक्त महासंचालक एस. दास यांनी ही नोटीस बजावली आहे. वाहतूकदारांना देण्यात आलेल्या पथकर शुल्क मूल्यबाबतची माहिती दिली नाही. या कारणास्ताव या तेल कंपनीला व्याज, दंड तथा अतिरिक्त दंडासह ४.६४ कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आली आहे. इंडियन आईल कंपनी एक माल वाहतूक संस्था म्हणून योग्य रीत्या करभरणा करत नसल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)
इंडियन ऑईलला ४.६ कोटींची नोटीस
केंद्रीय उत्पादन शुल्क महासंचालनालय अर्थात डीजीसीईआयने देशातील सर्वांत मोठी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला ४.६ कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. मालवाहतूक संस्था म्हणून करभरणा न केल्याने ही कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे.
By admin | Updated: May 14, 2014 03:45 IST2014-05-13T19:00:43+5:302014-05-14T03:45:17+5:30